computer

भारतीय प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहिलेले आजवरचे सर्व प्रमुख पाहुणे...१९५० ते २०२१ पर्यंतची संपूर्ण यादी पाहून घ्या!

एक स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही देश म्हणून भारताने २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी केली. तेव्हापासून, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत दरवर्षी एक भव्य समारंभ साजरा करतो. हा सोहळा दूरदर्शनवर आपण पाहतो आणि त्यात सम्पूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन परेडद्वारे दाखवले जाते. परेड ही आकर्षक असतेच त्याशिवाय दरवर्षी भारत सरकारकडून परदेशी नेत्यांना आमंत्रित केले जाते. याचीही सर्वाना खूप उत्सुकता असते.

यावर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला भारत दौरा रद्द केल्यानंतर २६ जानेवारी २०२१ ला भारतीय वंशाचे सूरीनामचे अध्यक्ष चंद्रिकेश्वरसाद संतोखी (Chandrikapersad Santokhi) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या सहा महिने अगोदर, भारत सरकार संबंधित राज्य प्रमुखांना किंवा सरकारला आमंत्रण पाठवते. हे निमंत्रण पाठवण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींकडून मंजुरी घेण्याबरोबरच पंतप्रधानांकडूनही मंजुरी घेण्यात येते. प्रोटोकॉल नुसार सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला आमंत्रण पाठवण्यात येते. कधी कधी एकापेक्षा अधिक पाहुण्यांनाही आमंत्रण दिले जाते.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ब्रिटनमधील कोविड -१९ मूळे यावर्षी आपला भारत दौरा रद्द केला. समजा हा दौरा रद्द झाला नसता तर यूके हा एकमेव असा देश बनला असता ज्यांचे नेते सहा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे पहिले प्रमुख पाहुणे होते. युनायटेड किंगडम आणि फ्रान्समधील प्रतिनिधींना प्रत्येकी ५ वेळा आमंत्रित केले गेले आहे.

१९५० पासून २०२१ पर्यंत अनेक परदेशी मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत हे सोहळे झाले आहेत. आज या लेखात आपण या सर्व पाहुण्यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

१९५०. अध्यक्ष सुकर्णो, इंडोनेशिया

१९५१. राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह, नेपाळ

१९५४. राजा जिग्मे दोरजी वांगचुक, भूतान

१९५५. गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद, पाकिस्तान

१९५६. Chancellor of the Exchequer आर.ए. बटलर, युनायटेड किंगडम व मुख्य न्यायाधीश कोतरो तानाका, जपान

१९५७. संरक्षण मंत्री जॉर्गी झुकोव्ह, सोव्हिएत युनियन

१९५८. मार्शल ये जियानिंग,  चीन

१९५९. ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप, युनायटेड किंगडम

१९६०. अध्यक्ष क्लीमेंट व्होरोशिलोव्ह, यूएसएसआर

१९६१. राणी एलिझाबेथ दुसरी, युनायटेड किंगडम

१९६२. पंतप्रधान विगो कॅम्पमन,  डेन्मार्क

१९६३. राजा नूरोडॉम सिहानोक, कंबोडिया

१९६४. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लॉर्ड लुई माउंटबॅटन,   युनायटेड किंगडम

१९६५. अन्न व कृषिमंत्री राणा अब्दुल हमीद, पाकिस्तान

१९६६. राजा मोहम्मद जहीर शाह,  अफगाणिस्तान

१९६८. पंतप्रधान अलेक्सी कोसिगिन, यूएसएसआर, अध्यक्ष जोसिप ब्रोझ टिटो एसएफआर, युगोस्लाव्हिया

१९६९. बल्गेरियाचे पंतप्रधान टोडर झिव्हकोव्ह,बल्गेरिया 

१९७०. बेल्जियन्सचा राजा बौदॉइन, बेल्जियम

१९७१. अध्यक्ष ज्यूलियस नायरेरे, टांझानिया

१९७२. पंतप्रधान सीवसूसूर रामगुलाम ,मॉरिशस

१९७३. अध्यक्ष मोबूतू सेसे सेको ,झैरे

१९७४. अध्यक्ष जोसिप ब्रोझ टिटो एसएफआर युगोस्लाव्हिया

     पंतप्रधान सिरीमावो रत्‍वटे डायस बांदरनायके श्रीलंका

१९७५. अध्यक्ष केनेथ कौंडा ,झांबिया

१९७६. पंतप्रधान जॅक चिरॅक, फ्रान्स

१९७७. प्रथम सचिव एडवर्ड जीरेक, पोलंड

१९७८. अध्यक्ष पॅट्रिक हिलरी, आयर्लंड

१९७९. पंतप्रधान मॅल्कम फ्रेझर, ऑस्ट्रेलिया

१९८०. अध्यक्ष वॅलरी गिस्कार्ड डी 'ईस्टिंग,  फ्रान्स

१९८१ अध्यक्ष जोसे लोपेझ पोर्टिलो , मेक्सिको

१९८२ किंग जुआन कार्लोस पहिला , स्पेन

१९८३ अध्यक्ष शेहू शगारी , नायजेरिया

१९८४. किंग जिग्मे सिंग्ये वांगचुक, भूतान

१९८५. अध्यक्ष राऊल अल्फोन्सन, अर्जेंटिना

१९८६. पंतप्रधान अँड्रियास पापांड्रयू, ग्रीस

१९८७.  अध्यक्ष अलान गार्सिया, पेरू

१९८८. अध्यक्ष जूनियस जयवर्धने, श्रीलंका

१९८९.  सरचिटणीस नुग्वेन व्हॅन लिन्ह, व्हिएतनाम

१९९०. पंतप्रधान अनिरुद्ध जुगनाथ, मॉरिशस

१९९१. अध्यक्ष माॅमून अब्दुल गयूम, मालदीव

१९९२. अध्यक्ष मारिओ सोरेस, पोर्तुगाल

१९९३.  पंतप्रधान जॉन मेजर , युनायटेड किंगडम

१९९४. पंतप्रधान गोह चोक टोंग, सिंगापूर

१९९५. अध्यक्ष नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिका

१९९६. फर्नांडो हेनरिक कार्डोसोचे अध्यक्ष, ब्राझील

१९९७. पंतप्रधान बसदेव पांडे, त्रिनिदाद आणि टोबॅगो

१९९८. अध्यक्ष जॅक्स चिराक, फ्रान्स

१९९९. राजा बीरेंद्र बीर विक्रम शाह देव, नेपाळ

२०००. अध्यक्ष ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरिया

२००१. अध्यक्ष अबेडलाझीझ बोटेफ्लिका, अल्जेरिया

२००२. अध्यक्ष कॅसम उटीम, मॉरिशस

२००३. अध्यक्ष मोहम्मद खतामी, इराण

२००४. अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, ब्राझील

२००५. किंग जिग्मे सिंग्ये वांगचुक, भूतान

२००६. राजा अब्दुल्ला बिन अब्दुलाझीज-सऊद , सौदी अरेबिया

२००७. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, रशिया

२००८. अध्यक्ष निकोलस सारकोझी, फ्रान्स

२००९. अध्यक्ष नूरसुल्तान नजारबायेव, कझाकस्तान

२०१०. अध्यक्ष ली मायंग बाक, कोरिया

२०११. अध्यक्ष सुसिलो बांबांग युधोयोनो, इंडोनेशिया

२०१२. पंतप्रधान यिंगलूक शिनावात्रा, थायलंड

२०१३. भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचक , भूतान

२०१४. पंतप्रधान शिंजो आबे, जपान

२०१५. अध्यक्ष बराक ओबामा, अमेरिका

२०१६. अध्यक्ष फ्रान्सोइस हॉलंडे, फ्रान्स

२०१७. मुकुट प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद, संयुक्त अरब अमिराती

२०१८. सुलतान हसनल बोलकीया, ब्रुनेई.

जोको विडोडो ,इंडोनेशिया

थोंगलून सिसॉलिथ ,लाओस

पंतप्रधान हून सेन ,कंबोडिया

नजीब रझाक,मलेशिया

अध्यक्ष हॅटिन कवा ,म्यानमार

रॉड्रिगो रो दूटरटे, फिलीपिन्स

हलीमाह याकोब, सिंगापूर

प्रयुथ चान-ओचा, थायलंड

नुगुयन झ्यूएन फॅक, व्हिएतनाम

२०१९. अध्यक्ष सिरिल रामाफोसा, दक्षिण आफ्रिका

२०२०. अध्यक्ष जैयर बोलसोनारो, ब्राझील

२०२१. अध्यक्ष चंद्रिकेश्वरसंत संतोखी, सुरिनाम

 

या यादीत काही वर्षे नमूद केली गेली नाहीत. त्या वर्षी कोणत्याही परदेशी पाहुण्यांना आमंत्रण दिले गेले नव्हते. याची कृपया नोंद घ्यावी.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required