दिनविशेष: भारतीय कार्टुनिस्ट मारिओ मिरांडा जयंती

भारतीय व्यंगचित्रकारांमध्ये मारिओ मिरांडा(२ मे १९२६- ११ डिसेंबर २०११) यांचं स्थान खूप वरचं आहे. त्यांची अनोखी चित्रशैली आणि व्यंगचित्रे खूप गाजली. गोव्यातल्या लोकांचं जीवनमान हे त्यांच्या भित्तीचित्रांचे  खास विषय. निवृत्तीनंतर ते गोव्यातल्या साष्टी तालुक्यातल्या लोटली गावांत रमले. गोवन शैलीतलं त्यांचं राहतं घरही शाम बेनेगलांच्या 'त्रिकाल' या सिनेमात दाखवलं होतं.  

त्यांना भारत सरकारने  1988 मध्ये पद्मश्री , 2002 मध्ये पदमभूषण आणि 2012 मध्ये पद्मविभूषण  या पुरस्कारांनी गौरवलं.  

त्यांचं Cafe Mondegar मधलं भित्तीचित्र विशेष प्रसिद्ध आहे.

आज त्यांच्या 90व्या जयंतीबद्दल गुगलने डूडल बनवून आदरांजली वाहिली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required