आग्रा विद्यापीठाची कमाल - सलमान खान आणि राहुल गांधीच्या नावाने काढल्या मार्कशीट !!

मंडळी सल्लू मियाँँचं सिनेमात चांगलं चालू असताना तो कशाला गेला आग्र्यात परीक्षा द्यायला ? हा प्रश्न कोणालाही पडेल. आता सलमानला वाटू शकतं की जाऊन परीक्षा पास करावी आणि डिग्री मिळवावी पण वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर परीक्षा कोण देतं भाऊ ?

मंडळी, हा सगळा प्रकार आहे उत्तरप्रदेशच्या आग्रा विद्यापीठाने तयार केलेल्या बोगस मार्कशीटचा. या मार्कशीट नुसार सलमान खानाने आग्रा विद्यापीठातून बी. ए. च्या प्रथम वर्षाची परीक्षा चक्क ३५ टक्के गुण मिळवून पास केली आहे. (सलमान सुद्धा काठावर पास बाबो !!)

हा प्रताप मार्कशीट बनवणाऱ्या कंपनीने केल्याचं म्हटलं जातंय. याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या फोटोच्या जागी सलमान खानचा फोटो चिकटवण्यात आला आहे. याशिवाय राहुल गांधीच्या नावाची मार्कशीट सुद्धा आग्रा विद्यापीठाने तयार केली आहे. म्हणजे हाईट झाली राव !!

एवढं होऊन सुद्धा आग्रा विद्यापीठाने असं काही झालचं नाही असं म्हटलंय !! बोला आता !!!

सबस्क्राईब करा

* indicates required