computer

मारुती सुझुकी ८०० ची लॅंबोर्गीनी कशी झाली? या भारतीयाने केलेला हा जुगाड पाहायलाच हवा!!

भारतात कार्समध्ये फेरबदल करून त्यांना विकणे बेकायदेशीर आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणावर जून्या आणि वापरात नसलेल्या गाड्या बदलून त्यांना दुसऱ्याच गाड्यांसारखे बनवून त्यांचा वापर सुरू असतो. मारुती ८००सध्या मार्केटबाहेर आहे. पण आजही ही गाडी जुगाड करून लोक इतर ब्रँडच्या गाडीसारखी बनवून फिरवत असतात. मध्यंतरी आसाममधल्या एका गॅरेजवाल्याने मारुती ८००पासून लॅंबोर्गीनी बनवल्याची गोष्ट आपण वाचली होती.

मॅग्नेटो ११ यांनी अशाच एका मारुती ८००ला लॅंबोर्गीनीसारख्या गाडीत बदलले आहे. त्यांनी ही गाडी कधीकाळी मारुती ८०० होती असे वाटणार देखील नाही अशा टू सीटर गाडीमध्ये बदलली आहे. त्यांनी अशाच एका मारुती ८००चे जिप्सीमध्येही रुपांतर केले आहे.

आता ही मारुती ८००ओपन रुफ गाडी झाली आहे. सेम टू सेम लॅंबोर्गीनी गलार्डॉ सारखा तिचा लूक आहे. या गाडीचे अनेक पार्टस हे त्यांच्या गॅरेजमध्येच बनविण्यात आले आहेत. या नव्या मॉडीफाईड कारला डिफ्युजरच्या साहाय्याने स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.

या गाडीमध्ये बदल करत असताना इंजिनच्या जागेला मात्र धक्का लागलेला नाही. नव्या गाडीतही इंजिन पुढच्या बाजूलाच आहे. हेडलँप्स मात्र बदलले आहेत. या नव्या गाडीत एलईडी प्रोजेक्टर हेडलँप्स बसविण्यात आले आहेत. गाडीला गंज लागू नये म्हणून या भावांनी तिला रेड ऑक्साईडने पेंट केले आहे. म्हणजे गाडी रस्त्यावर येईल तेव्हा फुल टू धमाल होईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.

पिवळ्या रंगाची गाडी अंधारात पंजाबी गाण्यांतल्या लॅंबोर्गीनीसारखीच चमचम करेल असा तिचा लूक आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required