computer

१७ वर्ष अँबेसिडरमध्ये जंगलात राहणारा माणूस? पण तो तिथे का गेला?

निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे आकर्षण अनेकांना असते. वेळ येत नाही तोवर आपण इंटरनेट, नोकऱ्या आणि सिमेंटचं जंगलच सोडून असं राहू-तसं राहू याबद्दल बरेचजण बढायाही मारतात. पण प्रत्यक्ष सर्वकाही सोडून जंगलात राहायला जायची वेळ आली की सहसा कुणीही तयार होणार नाही. पण कर्नाटकातील एक माणूस खरंच गेली १७ वर्षं एकटाच जंगलात राहत आहे. एवढे दिवस तो कुठे आहे याबद्दल कुणालाही पत्ता नव्हता.

चंद्रशेखर हे त्यांचं नाव. त्यांचं वय ५६ वर्षं आहे. हे चंद्रशेखर जंगलात खूप आत आपल्या अँबेसेडर गाडीत राहत होते. दक्षिण कन्नड येथील अडताळे आणि नेक्कारे या दोन खेड्यांच्या मध्ये हे जंगल आहे. मात्र हे चंद्रशेखरबाबा तिथे स्वतःच्या इच्छेने राहाय्ला गेले असतील असे वाटत असेल तर थांबा!!

चंद्रशेखर यांच्यावर एका सहकारी बँकेचे ४० हजारांचे कर्ज होते. कर्ज चुकवू न शकल्याने बँकेने त्यांचे घर आणि इतर वस्तू सील केल्या. त्यांच्याकडे स्वतःचे दीड एकर शेत होते. त्यांनी मग आपल्या बहिणीकडे राहण्यास सुरुवात केली. तिथेही अडचणी सुरू झाल्यावर त्यांनी आपला निर्णय पक्का केला. आपली गाडी काढली आणि ते जंगलात राहायला गेले.

या घटनेला आता १७ वर्षं उलटून गेली आहेत. आता ते जंगलात आपल्या गाडीच्या बॉनेटवर रेडिओ लावून राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. ते तिथेच राहतात, खातात आणि जंगलात रमतात. त्यांना जगात रस शिल्लक उरला नाही हेच यातून दिसते. जंगलाने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. तिथेच वाहणाऱ्या नदीत ते अंघोळ करतात. चंद्रशेखर जंगलात राहणाऱ्या त्यांच्या कारवजा घराजवळ काळवीट, बिबट्या, हत्ती अशा प्राण्यांचा वावर आहे. त्यांना त्यांचे हे आयुष्य चांगलेच आवडले आहे. म्हणूनच ते जंगल सोडून जाण्यास नकार देतात. ते सांगतात की आपण इथला साधा बांबू पण तोडला नाही. जर मी इथे छोटीशी गोष्ट जरी तोडली तरी वनविभागाचा माझ्यावर असणारा विश्वास नष्ट होईल.

शेवटच्या वेळी ते फक्त कोरोना लस घेण्यासाठी जंगलाबाहेर गेले होते. तेवढी एक वेळ सोडली तर ते जंगलातच राहतात. लॉकडाऊनचा फटका त्यांनाही बसला होता. या काळात त्यांना अनेक गोष्टी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. तेव्हा त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले होते आणि त्यांना पाणी तशाच काही गोष्टींवर गुजराण करावी लागली होती.

हो, पण आता त्यांचा शोध लागल्यानंतर कर्जबुडवेप्रकरणी पुढे काय होईल हे काही माहित नाही..

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required