मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गाडी १००-१२० च्या स्पीडने चालवता? तुमच्या घरी मेमो येईल.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे म्हणजे गाड्या जोरात पळवायचं कुरण. आत दोन टोलनाक्यांमध्ये चेकिंग होतं असं ऐकल्यामुळं आणि श्रमपरिहार म्हणून मध्ये फूडमॉलला थांबून वेळ काढायचे प्रकार तर नेहमीचेच. पण आता त्या रस्त्यावर गाडी १००-१२०च्या वेगात चालवली तर मात्र घरी मेमो यायला सुरूवात झालीय असं दिसतं. बोभाटा.कॉमकडे आलाय अशाच अर्थाचा एक व्हॉटसऍप मेसेज, ज्यात मालकाचं नांव, गाडीचं मेक -मॉडेल आणि गुन्ह्याचं रूप लिहून मालकास ७ दिवसाच्या आत कळंबोली आरटीओ ऑफीसमध्ये कागदपत्रांसह भेटायला  बोलावलंय. गाडी स्वत: चालवत नसल्यास ड्रायव्हरचं नांव आणि त्याच्या लायसन्सची माहितीही पोलिसांना द्यायचीय. हा पहा तो मेमो.

 

 

 

 

गोपनीयता जपण्यासाठी आम्ही व्यक्तिगत माहिती लपविली आहे. पण म्हणजे आता मुंबई-पुणे हायवे वर गाडी चालवताना सावध राहायला हवं

 

सबस्क्राईब करा

* indicates required