१२ ऑगस्टला रात्र होणार नाही ? काय आहे यामागील सत्य ??

१२ ऑगस्टला रात्र होणार नाही!! हा मेसेज सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि चक्क मिडियामधून सुद्धा प्रसारित होतोय. मंडळी आपणही हा मेसेज बघून थोडावेळ गोंधळात पडला असाल.  पण या मेसेजमागचं तथ्य काय? की सोशल मिडीयावरचा दरवेळी असतो तसा हा देखील एक सावळा गोंधळ आहे? चला तर जाणून घेऊया.

(स्रोत)

 

मिटीयोर शॉवर !

रात्रीचा दिवस करणाऱ्या या मेसेजमागचं खरं सत्य हे मिटीयोर शॉवर आहे. मिटीयोर शॉवर फक्त १२ तारखेलाला नव्हे तर १०-११-१२ असे तीन दिवस पाहायला मिळणार आहे. आधी तर हा मिटीयोर शॉवर काय आहे ते जाणून घेऊ.

(स्रोत)

मिटीयोर शॉवर म्हणजे उल्कांचा पाऊस. यावेळी अनेक उल्कांच्या तुकड्यांनी आकाश उजळून जातं आणि रात्र असूनसुद्धा दिवसाचा भास होतो पण उजेडाची तीव्रता नक्कीच एवढी नसते की रात्रीचा दिवस होईल. मंडळी या फिरणाऱ्या बातम्यांमध्ये नासाचं उदाहरण दिलंय, तसेच काही वृत्तपत्रातून बातमी छापून आल्या आहेत त्यांचे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत.

 

एवढ्या धावत्या जगात आपण असल्या बातम्यांवर विसंबून राहतो पण त्या मागचं कारण काही तरी भलतंच असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

सबस्क्राईब करा

* indicates required