आता DSLR ठेवा खिशात : लॉन्च झाला शाओमीचा बहुप्रतीक्षित ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन!!

बर्‍याच दिवसांपासून ताणून धरलेल्या युजर्सच्या प्रतिक्षेला पूर्ण विराम देत शाओमीने आपला पहिलावहिला ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला. आज दूपारी १२ वाजता नवी दिल्लीत संपन्न झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये या नव्या स्मार्टफोनची झलक पहायला मिळाली मंडळी. यातले लैभारी फिचर्स आणि आवाक्यातली किंमत बघता शाओमी परत एकदा बाजारपेठ गाजवणार हे नक्की...

Mi चा हा ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन पूर्णपणे नव्या सिरीजमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि त्याचं नाव ठेवलं गेलंय Mi A1. रेडमीच्या अन्य स्मार्टफोन्ससारखी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MIUI ची कस्टमाईज्ड स्कीन न मिळता प्युअर अॅन्ड्रॉईड नॉगट अॉपरेटींग सिस्टम मिळेल. आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत या स्मार्टफोनला अॅन्ड्रॉईड ओरियोचा अपडेटही मिळणार आहे.

Mi A1 चं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून पाहायला गेलं तर यामध्ये 2X अॉप्टीकल झूम देणारे १२ MP + १२ MP असे ड्युअल कॅमेरा आहेत. जे अत्युच्च दर्जाची फोटो क्वालिटी देतील. सेल्फीसाठी यामध्ये ५ MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेलाय. ४ GB रॅम आणि ६४ GB इंटर्नल मेमरीसोबत हा फोन तुमच्या हातात येईल फक्त आणि फक्त १४,९९९ रूपयांना!!

आणखी काही फिचर्स पाहता Mi A1 मध्ये फुल मेटल बॉडी, फिंगरप्रिंट सेन्सर, आयआर ब्लास्टर, गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन, स्नॅपड्रॅगन 625 अॉक्टा कोअर प्रोसेसर आणि ५.५ इंचाचा फुल HD डिस्प्ले मिळेल. थांबा, अजून एक सरप्राईज आहे. हा स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्व एयरटेल युजर्सना चक्क २०० जीबी 4G डाटा मोफत मिळणार आहे! आणि सोबत गुगल फोटोजवर अनलिमिटेड स्टोरेजची सुविधाही!!

इतक्या कमी किंमतीत इतकी सारी फिचर्स देणारा हा स्मार्टफोन भारतात १२ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. आता चीनवरचा तुमचा राग थोडा मावळला असेल तर विचार करायला हरकत नाही...

सबस्क्राईब करा

* indicates required