आत्महत्या करण्यासाठी गेलेली महिला चक्क २ वर्षांनी समुद्रात तरंगताना सापडली?

"देव तारी त्याला कोण मारी", "काळ आला होता पण वेळ आली नवह्ती" वगैरे म्हणी सार्थ ठराव्यात अशी एक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली एक बाई चक्क आता समुद्रात तरंगताना सापडली आहे.
ही बाई कोलंबिया देशामधली आहे. तिचं नाव आहे अँजेलिका गैटन. या बिचारीचा नवरा तिला त्रास देत होता. सातत्याच्या मारहाणीला कंटाळून दोन वर्षांपूर्वी तिने आपले घर सोडले होते. तीन दिवसांपूर्वी प्युर्टो कोलंबियाच्या तटावर ती पाण्यात तरंगत असलेली तिथेच मच्छीमारी करणाऱ्या रोलेंडो विसेबल आणि त्यांच्या सहकाऱ्याला दिसली.
भर पहाटे हे काय आहे ते पाहण्यासाठी गेले. त्यांना सुरवातीला तिथे तराफा तरंगतोय की काय असे वाटले. पण थोडे जवळ गेले तर त्यांना चक्क एक बाई पाण्यात तरंगताना दिसली. ती महिला हाताने मदतीसाठी बोलवत असल्याचे त्यांना समजल्यावर मग ते तिला बाहेर काढण्यासाठी धावले.
अधिक काळ पाण्यात राहिल्यामुळे ही बाई खूप थकली होती. तिला बाहेर काढण्याचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच वायरल झाला आहे. दोन वर्षे ती कुठं राह्यली, काय खाल्ले, कशी जगली याबद्दल अजून काही माहिती उपलब्ध नाही. पण काही असो, तिची इच्छाशक्ती मात्र अफाट होती हे खरं!!