मराठी माणसाने बनवलेले भारतातील पाहिले स्मार्ट नोटबुक...

मजेमजेचा उन्हाळा संपला आणि सुरु झाले नविन शैक्षणीक वर्ष  , शाळा -गृहपाठ -शिकवणी -शिकवणीचा गृहपाठ  , पावसाळा असल्याने खेळ पण बंद  अशा वातावरणात पोरं अगदी वैतागून जातात . तुमच्या घरी जर अशीच परीस्थिती असेल तर तुमच्या मदतीला आली आहेत मिथ्याची 4D नोटबुक्स  !! आता नोटबुक आणि  हसत खेळत अभ्यास हे काय गणित आहे असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर एक काम करा . गुगल स्टोअर वर जाऊन मिथ्या 4D अ‍ॅप डाउनलोड करा, ओपन करा आणि  खाली दिलेल्या चित्रावर मोबाईल धरा !!

क्षणार्धात ते चित्र जिवंत होऊन हालचाल करायला लागेल . नाचायला लागेल !!

काय आहे  ही जादू ?

या जादूला म्हणतात, ऑगमेंटेड रिआलिटी , आणि हे जादूगार आहेत श्रीकांत झवर, पण आधी आपण बघू या ऑगमेंटेड रिआलिटी म्हणजे नेमकं काय ?

कॅमेराच्या लेन्स समोर येणारं वास्तव आणि अ‍ॅपच्या मेमरीत साठवलेली अ‍ॅनीमेशन चित्रं यांचा मिलाप म्हणजे ऑगमेंटेड रिआलिटी  ! पोकेंमॉन चा गेम आठवतोय तुम्हाला ? तो सुध्दा ऑगमेंटेड रिआलिटी वर आधारीत होता.

हिच ऑगमेंटेड रिआलिटी ची कल्पना श्रीकांत झवर यांनी मिथ्या 4D च्या नोटबुक कव्हर मध्ये वापरली आहे. अशी अनेक हालणारी बोलणारी चित्रं त्यांनी या वह्यांमध्ये वापरली आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे , या नंतर कदाचित पाठ्यपुस्तकातील अनेक धडे या स्वरुपात तुमच्या सोबत येतील. कल्पना करा , इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत जर ऑगमेंटेड रिआलिटी जोडली तर कॅमेरा रोखला की महाराजांचे संपूर्ण चरीत्र तुमच्यासमोर सादर होईल. उपयोग अमर्यादीत आहेत  फक्त वापरकर्ता हवा आहे. 

आता बघा, आणखी काही फोटोतून ऑगमेंटेड रिआलिटीचा केलेला वापर

ऑगमेंटेड रिआलिटीचा शालेय शैक्षणीक साहित्यात  वापर करणारे श्रीकांत झवर हे पहिलेच उद्योजक आहेत. मूळचे उत्तर महाराष्ट्रातील मालेगावचे 'श्रीकांत झवर' अनेक वर्षे  युरोप आणि अमेरीकेतील अनेक कंपन्यांसाठी काम करत होते. मायदेशात परत आल्यावर त्यांनी हा उद्योग  सुरु केला ज्याचे वर्गीकरण ' स्टार्ट अप' या संकल्पनेत येते.

तुमच्या मनात अशाच काही कल्पना  घोळत असतील तर तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता.

आणि हो , हा ऑगमेंटेड रिआलिटीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ही पोस्ट तुमच्या टाइमलाइन वर शेअर करा . पहिल्या २५ शेअरकर्त्यांना मिथ्या 4D चे नोटबुक घरपोच मोफत मिळेल. ज्यांना ही नोटबुक्स खरेदी करायचे असतील त्यांनी 8888006622 या व्हॉट्सअॅॅप नंबर वर आपली मागणी नोंदवा.

बोभाटाच्या सर्व वाचकांना घरपोच पाठवण्यासाठी वेगळा खर्च घेतला जाणार नाही. 

सबस्क्राईब करा

* indicates required