computer

एका अंगठीत सर्वात जास्त हिरे बसवण्याचा विक्रम एका भारतीयाने केलाय...किती हिरे बसवलेत तुम्हीच पाहा !!

शौक बडी चीज है असे म्हटले जाते. हौसेखातर लोक काय काय करतात हे आपण बघत असतो. याच हौसेपायी किलो किलोचे सोने अंगावर चढवून फिरणारे लोकदेखील आपण बघत असतो.

हौसेमुळे लोकांना कधी कधी नुकसान देखील सहन करावे लागते, तर कधी काहींना फायदा होतो. हैदराबादमध्ये एकाला मात्र हौसेने थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेऊन ठेवले आहे. हैद्राबाद येथील हिरा व्यापारी कोट्टी श्रीकांत यांनी तब्बल ७८०१ हिरे वापरून अंगठी तयार केली आहे.

स्वतः हिरे व्यापारी असल्याने हिऱ्यांची श्रीकांत यांच्याकडे कमतरता नसेल. पण एवढ्याशा अंगठीत त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात हिरे कसे बसवले याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फुलाच्या आकाराची अंगठी तयार करत त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

या अंगठीचे नाव आहे, 'द डिव्हाईन- ७८०१ ब्रह्म वज्र कमलम.' हिमालयात ब्रह्मकमळ नावाचे एक दुर्मिळ फुल सापडते. त्याच फुलावरून प्रेरित होऊन त्यांनी ही अंगठी बनवली आहे. गिनीज बुकने तर ही अंगठी कशी तयार झाली याचा विडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

ही अंगठी कोट्टी श्रीकांत यांनी २०१९ सालीच पूर्ण करून गिनीज बुककडे पाठवली होती. नुकतेच त्यांचे नाव अधिकृतरित्या गिनीज बुकमध्ये नोंद झाले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required