टू-व्हीलर वाल्यांनो, आता गुगल सांगणार कोणत्या गल्लीमधून जायचं !!

गुगल मॅपच्या आधारे आपण प्रवासासाठी लागणारा वेळ, मार्ग सगळंच प्लॅन करू शकतो. रेल्वे, कार, सायकल किंवा पायवारी अश्या चार मार्गापैकी तुम्ही कोणत्याही मार्गाने प्रवास केला तर त्यासाठी लागणारा वेळ आणि दिशा गुगल आपल्याला दाखवत असतो. आता यात आणखी एक भर पडली आहे ‘मोटरसायकल मोड’ ची....म्हणजेच आता बाइकने प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा गुगल मदत करणार आहे.

मंडळी, हा नवीन फिचर गुगलने लाँच केलाय. मोटारसायकल मोडमुळे तुम्हाला पार्किंगची जागा आणि मोटरसायकलसाठी सुटेबल मार्ग आणि एकूण वेळ सुद्धा दिसणार आहे. शिवाय कोणत्या मार्गावर ट्रॅफिक असेल आणि कोणता मार्ग मोकळा तेही गुगल सांगणार आहे.

कार जिथे जाऊ शकत नाही तिथे बाइक जाते आणि सायकल ज्या वेगाने पळू शकत नाही त्या वेगाने बाइक पळते. म्हणूनच अनेकांची बाइक ही पहिली पसंती असते.

एकंदरीत काय तर, मनाला येईल तिकडे बिंदास प्रवास करा....गुगल आहे तुमच्या मदतीला !!!

सबस्क्राईब करा

* indicates required