computer

नीरज चोप्राच्या भाल्याचा लिलाव झाला, किती किंमत मिळाली ते हे पाहा!!!

ऐतिहासिक क्षणांना कारणीभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टी या ठेवा म्हणून जपून ठेवल्या जातात. त्यात अशाही काही गोष्टी असतात ज्या कालांतराने लिलावात विक्री होत असतात. या गोष्टींना मिळणारी किंमत ही मोठी असते.

संपूर्ण भारताचा अभिमान ठरलेला नीरज चोप्रा हा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यापासून सातत्याने चर्चेत असतो. पण यावेळी त्याचा भाला चर्चेत आला आहे. नुकताच पंतप्रधानांना मिळालेल्या खास भेटवस्तूंचा लिलाव पार पडला. ई-लिलाव पध्दतीने हा लिलाव पार पडला.

या लिलावात सर्वांत जास्त लक्ष खेचून घेतले ते नीरज चोप्राच्या भाल्याने. त्याच्या भाल्याला तब्बल दीड कोटी रुपयांमध्ये विकत घेतले गेले आहे. भवानीदेवी या अजून एका खेळाडूची सही असलेली तलवार १.२५ कोटीं रुपयांमध्ये विकली गेली आहे.,तर सुमित अंतील या अजून एका भालाफेक खेळाडूचा भाला १.२ कोटींमध्ये विकला गेला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लोवलीना बोर्गेहीन हिचे बॉक्सिंग ग्लोव्हज ९१ लाखांत विकले गेले आहेत. एकूण १३४८ वस्तूंचा लिलाव करण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती, बेल आणि चरखा अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी एकूण ८,६०० बोली आल्या होत्या.

सरदार पटेल यांच्या शिल्पाकृतीसाठी सर्वात जास्त म्हणजेच १४० बोली आल्या. तर लाडकी गणेशासाठी ११७ बोली आल्या. पुणे मेट्रो लाईन आणि विजयी मशाल यांच्यासाठी अनुक्रमे १०४ आणि ९८ बोली झाल्या. या लिलावातून आलेली रक्कम 'नमामी गंगे' मोहिमेसाठी जाणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required