या मराठी माणसानं आणलाय गोष्टी सांगण्याचा आधुनिक आणि भन्नाट मार्ग.. पाहाल तर तुम्हांलाही नक्की आवडेल..

Subscribe to Bobhata

गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत? लहान मुलांना तर गोष्टी ऐकायला सगळ्यात जास्त आवडतात . मग असतात आईच्या खास गोष्टी, बाबांच्या, आजीच्या, आजोबांच्या, मामा-मावशीनं सांगितलेल्या.. एक ना दोन. पण आता झालंय काय, आजी-आजोबा असतात एका गावात, झालंच तर  मामा, मावशी, काका, आत्या  आणखी किती किती ठिकाणी असतील हे काही सांगता यायचं नाही. बरं आपलं सगळं कुटुंब एकाच देशात असेल ही खात्री जिथं देता येत नाही, तिथं गावाचं काय घेऊन बसलात?

झालंच तर आजकाल ज्यांना अजून स्वत:चा शेंबूड पुसता येत नाही त्या मुलांनापण मोबाईलची किती सवय लागलीय हे आता आम्ही तुम्हांला सांगायला नको. जरा वेळ मिळाला की लगेच मुलं आईचा नाहीतर बाबाचा फोन घेऊन खेळायला सुरवात करतात. यामुळं मुलं दिवसेंदिवस घरकोंबडी होत चालली आहेत. 

यावर मुंबईच्या अमित देशपांडेंनी एक उपाय आणलाय. त्यांनी इंटरनेटसोबत कनेक्ट होऊ शकणारं एक गोष्ट सांगणारं खेळणं बनवलं आहे. यासोबत आहे एक मोबाईल ॲपसुद्धा.  हे मोबाईल ॲप वापरून तुम्ही गोष्टी रेकॉर्ड करू शकता आणि  जगातून कुठुनही इंटरनेटद्वारे या खेळण्याकडे पाठवू शकता.  म्हणजे आई, बाबा, आजोबा-आजी, काका-मामा, आत्या-मावश्या आणि जे कुणी हवे त्या सर्वांच्या रेकॉर्डेड गोष्टी बसतील या एका यंत्रात.  हे यंत्रही काही मोबाईलसारखं नाही. ते आहे एका प्राण्यासारखं दिसणारं. म्हणजे त्याला कडेवर घ्या, उचलून कुठेही फिरवा, हवंतर झोपताना आपल्या दुलईतपण घ्या.

मोबाईल ॲप वापरून पालक  एकमेकांसोबत ग्रुपसुद्धा बनवू शकतील. म्हणजे गोष्टींची देवाणघेवाण तर होईलच आणि आपल्याकडच्या खजिन्यात भर पडेल ती वेगळीच. 

मोठेपणीसुद्धा जिथं गोष्टी आपल्याला इतक्या आवडतात, तर मग लहानांना आपल्या आवडत्या लोकांकडून आलेल्या गोष्टी ऐकणं तर अधिकच आवडेल ना? या गोष्टी सांगणार्‍या खेळण्याची सध्या प्री-ऑर्डर घेणं चालू आहे. तुम्ही या लिंकवर [  https://igg.me/at/socialtoys  ] जाऊन तुमची मागणी नोंदवू शकता..

सबस्क्राईब करा

* indicates required