computer

न हरवलेल्या मुलीने दुकानात गिर्‍हाईक खेचून आणलं! जाहिरात आणि जाहिरातींचे फंडे!

दुकानात गिर्‍हाइकांची वर्दळ वाढवायची आहे? तुफानी विक्री करायची आहे? तर यासाठी काहीतरी डोकॅलिटी करावीच लागते. कालच अशी एक जाहिरात आम्ही आंतरजालावर बघितली. ठाण्यातल्या मुलींचे एका तयार कपडे विकणार्‍या दुकानदाराने -राहुल सुराणाने- ही जाहिरात बनवली आहे. एखाद्या वृत्तपत्रातील ही जाहिरात आहे असे वाटले तरी ती कोंणत्याही वृत्तपत्रात ती आलेली नाही. फक्त आंतरजालावर प्रसिध्दी करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला आहे. या जाहिरातीत Missing आणि सुंदर मुलीचा फोटो पाहिल्यावर लगेच जाहिरात वाचली जाते. वाचून झाल्यावर लक्षात येतं की ही मायरा ब्रँडच्या कुर्तीची जाहिरात आहे. अर्थात जाहिरातीमुळे दुकानात वर्दळ वाढलीच असेल. अजून ही जाहिरात व्हायरल झालेली दिसत नाही, पण येत्या काही दिवसांत अशा जाहिरातींचा ट्रेंड येणार हे नक्की! तुम्हाला जर तुफानी विक्री करायची असेल तर असं काहीतरी डोकं लढवायलाच लागेल नाही का?

आता बोभाटा करायचा म्हणून या जाहिरातीचा बोभाटा आम्ही करणार नाही हे तुम्हालाही माहिती आहेच. जाहिरातीचा हा प्रकार नवा नाही. झिलमिल सितारोंका आंगन होगा हे गीत आठवत ? हे ज्या चित्रपटात होतं त्या आपल्या धर्मेंद्रपाजीच्या 'जीवन मृत्यू' चित्रपटाची जाहिरात टाइम्स ऑफ इंडियामध्ये अशाच पध्दतीने करण्यात आली होती. ती इतकी चालली की त्याच शैलीत पोस्टरची पण निर्मिती करण्यात आली. टाइम्सची ती जाहिरात आता उपलब्ध नाही, पण जीवनमृत्यूचे बंगाली भाषेतील पोस्टर मात्र काहीजणांकडे आहे.

 

अशा जाहिरातीचा जाहिरातदारावर उलटलेलाही एक किस्सा आहे. २०१७मध्ये एक सिनेमा आला होता-पिहू. दोन वर्षांची मुलगी घरात एकटी असते, आई बेशुद्ध, बाबा घरात नाही, भुकेली पोर काही अन्न मायकोवेव्हमध्ये गरम करु पाहाते, ते पेट घेतं आणि बरंच काही त्या दोन वर्षांच्या मुलीवर ओढवतं. हा प्लॉटच बऱ्याच जणांना आवडला नव्हता. या सिनेमाची जाहिरात म्हणून त्या चिमुकल्या मुलीला काही लोकांना फोन करायला लावले होते. त्यात ती घरात एकटी आहे आणि सिनेमातले काही प्रसंग आत्ता तिच्या भवताली घडत आहेत म्हणून ती लोकांना सांगत असे. घरात, रस्त्यावर, ऑफिसमध्ये असे अचानक फोन येणं, त्यातही दोन वर्षांचं लेकरु असं काही रडत सांगत असणं हा लोकांच्या भावनेशी केलेला क्रूर खेळ आहे असं म्हणत अनेक लोकांनी या फोन कॉल्सवर आक्षेप घेतला.

जाहिरात खरी, पण कुठे थांबावं हे ही कळायला हवं. असो. बघा,लढवा डोकं आणि करा बोभाटा तुमच्या धंद्याचा!!

सबस्क्राईब करा

* indicates required