अनलॉकमध्ये बाहेर जात आहात? मग आधी ही फेविकॉलची जाहिरात पाहा!!

आता अनलॉकला सुरुवात झालीय. पुन्हा एकदा हळूहळू आपलं आयुष्य पूर्वपदावर येईल. पण तरीही आपल्याला काळजी ही घ्यायलाच हवीय. नेमका हाच संदेश घेऊन फेव्हिकॉलने आपली नवी जाहिरात आणली आहे. या जाहिरातीमधून त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सावधानतेचा इशारा दिला आहे.
फेव्हिकॉलने लोकांना बाहेर निघाल तेव्हा चेहऱ्यावर मास्क आणि लोकांमध्ये २ फूट अंतर असू द्यावे अशी विनंती या जाहिरातीतून केली आहे. या व्हिडिओची संकल्पना आणि त्यामागचा आवाज हा Ogilvy चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर आणि भारताचे चेअरमन असलेल्या पियुष पांडे यांचा आहे. या कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी आपण आपल्या पध्दतीने काय करु कशी मदत करू शकतो या विचारातून फेव्हिकॉलने ही जाहिरात सादर केली आहे.
ही जाहिरात संदेश देत आहे की लढाई संपलेली नाही, आता फक्त मैदान बदलले आहे. आधी घरात बसून लढाई लढावी लागली, आता घराच्या बाहेर लढावी लागेल. लढण्यासाठी जगावे लागते आणि जगण्यासाठी सामान लागते, ते आणण्यासाठी बाहेर तर पडावेच लागेल. पण बाहेर पडूनही ही लढाई सुरू आहे हे प्रत्येकाने लक्षात असू द्यावे.
या व्हिडिओत फेव्हिकॉलच्या नेहमीच्या लोगोत एक बदल दिसत आहे. फेव्हिकॉलच्या नेहमीच्या हत्तींनी चक्क मास्क बांधला आहे आणि बॅकग्राऊंडला पियुष पांडे यांच्या आवाजातला संदेश ऐकू येत आहे. फेव्हिकॉलने नव्याने जोमाने, नव्या पध्दतीने कोरोनाला हरविण्याची विनंती भारतीयांना केलेली आहे.