१ ऑक्टोबरपासून मोटार वाहन नियमात झालेले ४ महत्त्वाचे बदल!!

सरकारने वाहन चालकांसाठी एक नवी नियमावली जाहीर केली आहे. हे नियम आपल्या रोजच्या आयुष्यात बदल घडवू शकतील असे आहेत. १ ऑक्टोबर ही तारीख अनेकार्थाने महत्वाची असणार आहे. अनलॉक ५चे नविन नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच बँकिंग, उज्वला योजना यांच्यासंबंधी अनेक नियम सरकारकडून बदलण्यात आले आहेत. आज आपण मोटर वाहन नियमानुसार काय बदल घडून येणार आहेत ते समजून घेऊया.
1) नव्या नियमानुसार वाहनासंबंधित कागदपत्रांची वैधता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेक करून झाली असेल तर कोणताही पोलीस अधिकारी त्यांची प्रत्यक्ष स्वरूपात मागणी करू शकत नाही. यात ड्रायविंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स डॉक्युमेंटस यांचा समावेश आहे. हे डॉक्युमेंट्स डिजीलॉकर किंवा एम परिवहन पोर्टलवर अपलोड केले जाऊ शकतात.
2) वेब पोर्टलवर रिव्होक्ड आणि डिसक्वालीफाय म्हणजेच रद्दबातल आणि अपात्र ठरवले गेलेल्या ड्रायविंग लायसन्सची माहिती क्रमवारीनुसार अपडेट करण्यात येईल. यामूळे अधिकाऱ्यांना ड्रायव्हर्सच्या व्यवहारानुसार देखरेख करता येईल.
3) प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यावर असलेले बंधन काढून टाकण्यात आले आहे. यापुढील काळात फक्त मॅपचा वापर करण्यासाठी मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात येईल.
4) इ-चलन पोर्टलद्वारे देण्यात येणार आहे.
या सर्व नियमांमुळे अनेक कटकटी दूर होणार आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण अजूनही अनेक सोप्या असू शकणाऱ्या गोष्टी किचकट आहेत. किमान काही गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.