computer

चला,तयारीला लागा-टाटांच्या एअर इंडियात आता मोठी नोकरभरती !

जगभर नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. पोरांच्या चेहऱ्यावर असणारा तणाव लपत नाही. अशावेळी मात्र नेहमी प्रमाणे टाटाच धावून आले आहेत.. नुकतेच ज्यांची नोकरी गेली अशा लोकांना टाटा समूहाची आयटी कंपनी नोकरी देणार असे घोषित करण्यात आले आहे.आणि आता तर सर्वांना सुखावणारी नवी बातमी आली आहे. टाटाच्या हातात गेल्यानंतर अच्छे दिन अनुभवत असणाऱ्या एअर इंडियाने येत्या वर्षभरात ५ हजार नवे कर्मचारी भरणार असल्याचे घोषित केले आहे.

एअर इंडियाकडून २०२३ या वर्षात ४२०० कॅबिन क्रू तसेच ९०० पायलट भरती केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.नुकतीच एअर इंडिया आणि बोईंग तसेच एअरबस एसई यांच्यात तब्बल ४७० विमाने पुरवण्याचा सौदा झाला आहे.. या सौद्यामुळे एअर इंडियाला कमालीची कलाटणी मिळणार आहे.

एयर इंडियाकडून भरती केल्या जाणाऱ्या कॅबीन-क्रुची भरती संपूर्ण देशातून होणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांना १५ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.क्लास रूम आणि थेट प्रॅक्टिकल फ्लाईट एक्सपेरीयंस अशा दोन्ही प्रकारचे ट्रेनिंग त्यांना देण्यात येईल.

एअर इंडियाकडून होत असलेली ही काय पहिलीच भरती नाही. याआधी मे २०२२ ते, फेब्रुवारी २०२३ या दरम्यान ११०० कॅबिन क्रु प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यातले ५०० कॅबिन क्रू हे कामासाठी तयार देखील झाले आहेत. एयर इंडियाचा कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

भविष्यात अधिक जास्त प्रमाणात पायलट आणि मेंटेनंस इंजिनियर कामासाठी घेण्याचा आपला विचार असल्याचे देखील एयर इंडियाचे अधिकारी सांगत आहेत. एयर इंडियाची खरी शान -महाराजा- गेल्याच वर्षी त्यांच्या खऱ्या खुऱ्या संस्थापकांच्या हातात गेल्या वर्षी गेला आहे.

एअर इंडियाची सुरुवात केली टाटांनी पण नंतर या कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले. तब्बल सात दशके ही कंपनी टाटांपासून दूर होती. गेल्याच वर्षी तब्बल १८००० कोटी रुपयांना टाटांनी एयर इंडिया पुन्हा स्वतःकडे घेतली आहे. आता एयर इंडियात त्यांच्या प्रवाशांसाठी रतन टाटा यांचा विशेष संदेश देण्यात येत असतो.

अशा पद्धतीने वणव्यात गारव्याचा आनंद या प्रकारे नोकरकपातीत नोकर भरतीचा आनंद टाटांनी देऊ केला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required