येणार.. येणार.. येणार... नोकिया ३३१० परत येणार

अरे ’नोकिया-तेतीसधा’ बस नाम ही काफी है ना भौ!!!

 काय जमाना होता राव.. एकदा बॅटरी चार्ज केली तर बुंगाट चार दिवस चालायची. चार्जिंगच काय टेन्शनच नाय. जाड्या पिनचे चार्जर सगळ्यांकडे असायचे. अरे त्यावरच्या स्नेकचा गेम  तर लैच भारी होता. फोन पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला तरी टेन्शन नाय.. उखडलेली बॅटरी लावली की फोन बिनधास्त सुरु! सगळ्यात भारी उपयोग होता एखादया पकवणाऱ्या मित्राला मारण्यासाठी. या तेतीसधा वरून एशेमेस पाठवून जमलेलं सूत आठवलं राव आज..

शेंबड्या पोरांच्या हातात आयफोन, स्मार्टफोन असणाऱ्या या जमान्यात आपला लाडका तेतीसधा परत येतोय. मोबाईल वर्ल्ड कॉग्रेसमध्ये त्याचा रिलॉंच होणार आहे. काही नवीन फीचर्स येतायत.. अलार्म, ऍलर्ट्स, कल्क्युलेटरसोबत चार गेम्सपण असणार आहेत. किंमत चार-पाच हजाराच्या आसपास असणार आहे. अजून काय पाहिजे राव? लै भारी काम आहे हे.

सबस्क्राईब करा

* indicates required