computer

किम जोंग उनने कुत्र्यांना मारण्याचा आदेश का दिलाय ?

कोरोनाकाळात अनेक देशांवर वेगवेगळे संकट कोसळले आहेत. उत्तर कोरिया सुद्धा यापासून अलिप्त नाही. तिथे तर थेट अन्नाची कमतरता भासत आहे. अशाप्रसंगी तिथल्या शासकाने काय करावे? तर त्याने चक्क कुत्री मारून खाण्याचा फर्मान काढला आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या विचित्र आदेशांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. द डिक्टेटर नावाच्या सिनेमात माथेफिरू हुकूमशहा कसे असतात याचे अचूक वर्णन केले आहे. पण तो सिनेमा असूनदेखील फिका वाटेल असे निर्णय किम जोंग घेत असतो.

सध्या असाच एक आदेश त्याने काढला आहे. अन्नाची कमी भरून काढावी या उद्देशाने कुत्री मारण्यात यावी हा तो आदेश. या निर्णयाने पाळीव कुत्रे ज्यांची आहेत त्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. जर तुम्ही कुत्रा पाळला असेल किंवा तुमच्या ओळखीत कुणी पाळला असेल तर ही कुत्रे घरातील सदस्यासारखी झालेली असतात हे तुम्हाला माहीत असेल अशावेळी त्यांच्या जीवावर आलेले संकट कुणाला अस्वस्थ नाही करणार?

काही दिवसांपूर्वी त्याने कुत्रे पाळणे हेच बेकायदा असल्याचे घोषित केले होते. कुत्रे पाळणे हे भांडवलशाहीचे लक्षण असल्याचे तो म्हणतो. जिथे लोकांना खायला मिळत नाही तिथे कुत्रे पाळण्याची चैन का म्हणून करायची असा त्याचा प्रश्न आहे.

उत्तर कोरियात कुत्र्यांचे जेवण हे स्वादिष्ट समजले जाते. म्हणूनच हा उपाय म्हणून पुढे आला आहे. ज्यांचे पाळीव कुत्रे आहेत त्यांच्याजवळ कुत्रे सोपविण्याशिवाय दुसरा उपाय देखील नाही. हुकूमशहा म्हणेल तोच अंतिम निर्णय असतो

पाळीव कुत्रे मोजण्यासाठी तिथे समिती नेमण्यात आली आहे. एकदा मोजणी पूर्ण झाली की लोकांकडून त्यांचे कुत्रे काढून घेऊन त्यांची रवानगी रेस्टॉरंट्समध्ये करण्यात येणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required