दौलतराम हाजीर हो !!!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एन.सी.पी. चे नवाब मलिक, महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत, भाजपाचे विनोद तावडे आणि वैकय्या नायडू यांच्यानंतर डॉक्टर मफ्फझल लकडावाला यांच्या वॉर्डात दाखल होणार आहेत मध्यप्रदेशचे दौलतराम जोगावत.

दौलतराम यांचा फोटो वापरून शोभा डे यांनी ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेतल्याची घटना ताजीच असताना दौलतराम यांची ‘बॅरीअॅट्रीक सर्जरी’ मुंबईतल्या सैफी हॉस्पिटलमध्ये होणार असण्याची ताजी खबर आहे. इजिप्तमधल्या ५०० किलो वजनाच्या एका महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर मफ्फझल लकडावाला यांच्यासाठी १८० किलो वजनाचे दौलतराम जोगावत यांची वजन कमी करण्यासाठी होणारी शस्त्रक्रिया  म्हणजे  एक रुटीन सर्जरी आहे. डॉक्टर लकडावाला हे 'Obesity digestive surgery' या विषयाचे विशेष तज्ञ आहेत. बोभाटाच्या ‘गरजू’ वाचकांसाठी डॉक्टर मफ्फझल लकडावाला यांचा पत्ता देत आहोत. सुरुवातीची फी अंदाजे साडेतीन हजार रुपये आहे.

CODS INDIA PRIVATE LIMITED,

GROUND FLOOR, SHIVTAAPI SOCIETY,

GOREGAOKAR MARG, OPP. METRO MOTTERS,

MUMBAI.

सबस्क्राईब करा

* indicates required