computer

सलग ७५ वर्षे मुलांना मोफत शिक्षण देणारे आजोबा !!

कुठल्याही देशाच्या प्रगतीत शिक्षणाचा वाटा मोठा मानला जातो. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण देशात अनेक ठिकाणी चांगल्या शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा अजूनही मिळत नाहीत. मात्र अशा ठिकाणी निस्वार्थ मनाने काम करणाऱ्या अनेक संस्था आणि शिक्षक अशा मुलांना मोफत शिकवून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी झटत असतात.

ओडिशामध्येही एक आजोबा गेली अनेक वर्षे मुलांना मोफत शिकवत आहेत. एका झाडाखाली ते मुलांना घेऊन बसतात आणि त्यांना शिकवतात. गेली ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ हा त्यांचा दिनक्रम आहे. याबदल्यात ते कुठलीही अपेक्षा करत नाहीत. सर्व काही ते मोकळया मनाने करत आहेत.

ओडिसामधील जजपुर येथील बरतांडा हे त्यांचे गाव. तिथले सरपंच सांगतात, "ते गेली ७५ वर्षं मुलांना शिकवत आहेत. त्यांनी कुठलीही सरकारी मदत याकामी घेतली नाही. शिकवणे हा त्यांचा छंद आहे. पण आम्ही आता अशी सुविधा त्यांच्यासाठी निर्माण करणार आहोत, ज्या माध्यमातून ते मुलांना चांगल्या वातावरणात शिकवू शकतील."

कोरोना आला तेव्हापासून अनेकांना शाळेत जाता येत नाही आहे. पण त्यावरही लोक तोडगा काढत आहेत. घरांच्या भिंतीवर पूर्ण अभ्यासक्रम उतरवण्यापासून वेगवेगळ्या उपायांनी ऑनलाईन शिक्षण साधे-सोपे-सुलभ करण्यासाठी शिक्षक हरतर्‍हेचे प्रयत्न करत आहेत. या आजोबांसारखे लोकही कुठलीही अपेक्षा न ठेवता कित्येक पिढ्या घडवण्याचे काम करत आहेत. अशा लोकांबद्दल वाचून त्यांच्यासारखे काम करणारे नवे शिलेदार समाजात अजून निर्माण झाले तर निश्चितच देशाचे भविष्य उज्वल असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required