ओल्ड मॉंक- जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारतातल्या पहिल्या रमचं काय कनेक्शन आहे ??

भारतीय तळीरामांचं पहिलं प्रेम म्हणजे ‘ओल्ड मॉंक’!!  या प्रसिद्ध ‘रम’ चे निर्माते कपिल मोहन यांचं ६ जानेवारी, 2018 रोजी निधन झालं. कपिल मोहन यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते स्वतः दारू बनवण्याच्या व्यवसायात असले तरी ते साधी सुपारी देखील खायचे नाहीत.

चला तर आज जाणून घेऊया ‘ओल्ड मॉंक’च्या मागे काय कहाणी दडली आहे ते...

.

स्रोत

कपिल मोहन यांच्या वडिलांनी ‘डायर मेकीन ब्रुअरीज’ नावाचा दारूचा कारखाना खरेदी केला. हा कारखाना एडवर्ड अब्राहम डायर यांचा होता. ते इंग्लंडहून भारतात दारूचा कारखाना उभारायला आले होते. त्यांनी डायर मेकीन्सचा पहिला कारखाना हिमाचल प्रदेश मधील कसौली येथे उभारला, कारण तिथलं पाणी दारू बनवण्यासाठी अतिशय उत्तम होतं. या कंपनीतून पहिली बियर-‘लिओन बियर’ तयार झाली. हा आशिया खंडातील पहिला दारूचा कारखाना होता.

याच एडवर्ड डायर यांच्या मुलाचं नाव पुढे भारताच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं..  कारण त्यांचा मुलगा म्हणजे एडवर्ड हॅरी डायर यानेच जालियानवालाबाग हत्याकांड घडवून आणलं होतं. हा भारतीय इतिहासाशी ओल्ड मॉंकचा एक वेगळा संबंध म्हणता येईल.

स्रोत

पुढे १८५५ साली कपिल मोहन यांच्या वडिलांनी डायर मेकिन ब्रुअरीज कंपनी विकत घेतली आणि त्याचं नाव मोहन मेकीन ब्रुअरीज असं ठेवलं. पण या कंपनीचा स्टार ठरलेली ओल्ड मॉंक यायला अजून वेळ होता. तोपर्यंत मोहन मेकीन बियर आणि रम व्यवसायात स्थिर झाले होते. पुढे १९ डिसेंबर १९५४ रोजी ‘ओल्ड मॉंक’ पहिल्यांदा बाजारात आली आणि अल्पावधीत ती संपूर्ण देशाच्या पसंतीस उतरली.

१९६६ साली ‘मोहन मेकीन ब्रुअरीज’ या नावातून ब्रुअरीज काढून टाकण्यात आलं. आता ही कंपनी ‘मोहन मेकीन’ नावाने ओळखली जाते.

ओल्ड मॉंक प्रसिद्ध होण्यामागच्या अनेक कारणांमागील एक कारण होतं त्याची किंमत... आजही ओल्ड मॉंक परवडेल अशाच भावात मिळते. रमच्या ब्रँड्समध्ये ओल्ड मॉंकबरोबर स्पर्धा करणाऱ्या अनेक रम आल्या, पण ओल्ड मॉंकने आपली जागा अनेक वर्ष कायम ठेवली.

स्रोत

दिवस पालटले तसे ओल्ड मॉंक मागे पडू लागली. काही दिवसांपूर्वी अश्याही बातम्या येत होत्या की ओल्ड मॉंक बंद होणार आहे.. पण मोहन मेकीनने या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

तर अशा या ओल्ड मॉंकच्या एका बाटली मागे मोठी स्टोरी आहे मंडळी !!

ओल्ड मंकची जादू तरी बघा. अमिताभ बच्चन यांना सुद्धा आपला मोह आवरता आला नाही. विश्वास बसत नसेल तर 'शराबी' मधलं हे गाणं ऐका.

सबस्क्राईब करा

* indicates required