computer

२५० वर्षे जुनी दारू तब्बल इतक्या मोठ्या किमतीला विकली गेली आहे!!

असे म्हणतात की दारू जेवढी जुनी तितकी जास्त चढते. म्हणून ७ वर्ष ब्लेंडेड, १४ वर्ष ब्लेंडेड असलेल्या दारूंना विशेष मागणी असते. पण अमेरिकेत थेट २५० वर्ष जुनी दारू विकली गेली ती पण कितीला? तर चक्क एक कोटीला. काय आहे स्टोरी, चला समजून घेऊया.

अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे पी मॉर्गन यांच्याशी संबंधित एक तब्बल 250 वर्ष जुनी दारूच्या बाटलीचा नुकताच लिलाव पार पडला. ही बाटली एक कोटी रुपयांना खरेदी केली गेली आहे. 1850 च्या दरम्यान या दारूची निर्मिती झाली असल्याचा अंदाज आहे. 

या बाटलीची लिलावात किंमत २० ते ३० हजार डॉलर्स एवढी ठरविण्यात आली होती. पण ही बाटली मॉर्गन लायब्ररी, म्युझियम आणि रिसर्च इंन्स्टीट्यूट यांच्याकडून तब्बल १ लाख ३७ हजार डॉलर्स म्हणजे भारतातील एक कोटी रुपये एवढ्या किमतीला खरेदी केली गेली आहे. 

मॉर्गन यांच्या सेलमधील बाटल्यांपैकी ही एकमेव सापडलेली बाटली आहे. एवढ्या वर्षांनी मात्र यातली दारू पिण्याजोगी उरली नाही यात शंका नाही. मात्र आपल्या संग्रही असावी या हेतूने ही बाटली खरेदी करण्यात आलेली आहे.

एखादी गोष्ट आपल्या संग्रही असावी यासाठी काही लोक किती मोठी किंमत खर्च करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required