मुलीला थंडीपासून वाचवण्यासाठी १३ कोटी जाळणारा बाप !!

“पाब्लो एस्कोबार गॅविरिया” हे नाव तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असेलही  किंवा नाहीही. या माणसाच्या आयुष्यावर आधारित असलेली ‘नार्कोस’ ही मालिका चांगलीच गाजली.  पाब्लो एस्कोबार हे नाव ड्रग्सच्या दुनियेतलं एक मोठं नाव होतं. कोकेनचा किंग ते ड्रग लॉर्ड अशी नावं त्याला मिळाली होती. त्याच्या ड्रग्सच्या धंद्यातून तो हप्त्याला ४२ कोटी एवढी कमाई करत असे.

पाब्लोसारखा खोऱ्याने पैसा ओढणारा हा कितीही मोठा अब्जाधीश असला तरी तो १३ कोटी का जाळेल ? याचं उत्तरदेखील त्याच्या धंद्यातच आहे.

स्रोत

ड्रग्स आणि अवैध धंद्यातून पाब्लो एस्कोबार हा पैश्यांमध्ये लोळत होता, पण या धंद्यात जसा पैसा होता तसाच पाठलागही होता. त्याच्या मागे ‘ग्यारह मुलखो की पुलिस’ हात धुवून लागलेली होती. असेच एकदा  पोलीस त्याच्या मागावर असताना त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ‘मेडेइन’च्या पर्वतीय भागात काही काळ राहावं लागलं होतं. हा भाग बर्फाळ असल्याने तिथे कडाक्याची थंडी होती. या थंडीमुळे पाब्लोच्या मुलीला हायपोथर्मियाचा (शरीराचं तापमान अतिशय कमी झाल्याने) त्रास सुरु झाला. अशात आजूबाजूला जाळण्यासाठी काही नसल्याने त्याने जवळचे २० लाख डॉलर्स म्हणजे जवळजवळ १३ कोटी डॉलर जाळले आणि त्या शेकोटीतून मुलीचा जीव वाचवला.

स्रोत

पुढे सुरक्षित बाहेर पडल्यानंतर पाब्लोच्या मुुलाने एका इंटरव्ह्यूमध्ये हा किस्सा सांगितला होता. त्याने हेही सांगितलं की हा पाठलाग सुरु असताना ते दर २ दिवसांनी आपलं ठिकाण बदलत असत.

पाब्लोला एक यशस्वी गुन्हेगार म्हणून बघितलं जातं. त्याला फोर्ब्सने १९८९ साली जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं. काहीही झालं तरी तो एक गुन्हेगार होता आणि त्याचा मृत्यूदेखील गुन्हेगार म्हणूनच झाला. १९९३ साली एका एन्काउंटरमध्ये तो मारला गेला पण त्याचा हा किस्सा आजही जगभर लोकप्रिय आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required