खारूताईला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आयुष्य खर्ची केलेला फोटोग्राफर...त्याच्या फोटोग्राफीचे निवडक नमुने पाहा !!
फोटोग्राफर म्हटलं की आपल्याला निसर्गाचे, लोकांचे, वस्तूंचे फोटो घेणारा माणूस आठवतो, पण एकच एका गोष्टीसाठी आयुष्य वाहिलेला फोटोग्राफर पाहिलाय का? आज आम्ही ज्या फोटोग्राफरचे फोटोज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तो फक्त खारूताईचे फोटो घेतो. आहे न विचित्र ?
त्याचं नाव आहे गेर्ट वेगन (Geert Weggen). तो स्वीडनचा आहे. गेर्ट सुरुवातीला घराजवळ येणाऱ्या प्राण्यांचे फोटो काढायचा. त्याच्या छंदाचं रुपांतर पुढे करियरमध्ये झालं. त्याने निसर्गाचे फोटो काढण्यात स्पेशलायझेशन मिळवलं. त्याला आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मग एके दिवशी तो लाल रंगाच्या खारीकडे आकर्षित झाला आणि तो आता केवळ खारीला कॅमेऱ्यात टिपतो आहे. तो लाल खारींच्या फोटोग्राफीत विशेषज्ञ म्हणून ओळखला जातो. त्याचे काही फोटो पाहून हे फोटोशॉप तर नाही ना, असा प्रश्न पडतो पण ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत. तो हे फोटोज इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतो. ७६००० पेक्षा जास्त लोक त्याला फॉलो करतात.
चला तर जास्त वेळ न दवडता गेर्ट वेगनची फोटोग्राफी पाहूया. खारूताईच्या जीवनातील हे वेगवेगळे क्षण तुम्हाला नक्कीच मजेशीर वाटतील.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५. त्याने एवढे अविश्वसनीय फोटो कसे घेतले त्याचं उत्तर खालील व्हिडीओमध्ये आहे.