एका कॉमाने पंतप्रधान कार्यालयालाही सोडलं नाय...बघा कशी गडबड करून ठेवलीये !!

मंडली,  आपला आनि इंग्लिसचा काडीचा संबंध नाय. पन ज्यांना इंग्लिस येतं त्यांच्याकडून तरी चांगल्या इंग्लिसची अपेक्षा असायलाच पायजे. आता मला सांगा, आमच्या सारखा अडाणी माणूस चुकीची इंग्लिस बोलला तर काय फरक पडतो?  पन खुद्द भारताच्या पंतप्रधान कार्यालयातून चुकीची इंग्लिस बाहेर पडली तर काय लाज राहिली राव !!

तर झालंय असं की, पंतप्रधान कार्यलयाचं जे ट्विटरवर अकाउंट हाय, त्यावरनं एक ट्विट आली. त्यात लिवलं होतं :

“Let us work together in providing the poor quality and affordable healthcare”

आता आमाला काय कळतंय, काय लिवलंय?  आमच्या मास्तरानं त्याचा अर्थ सांगितला तो असा.

“चला सारे मिळून खराब गुणवत्ता असलेली आणि स्वस्त अशा आरोग्यसेवेची निर्मिती करूया.”

आयची आन घेऊन सांगतो, हे ऐकून आमाला दिवसा चंद्र-तारे दिसले. मंडली,  त्यांना खरं तर म्हनायचं होतं :

“चला सारे मिळून गरिबांसाठी चांगली गुणवत्ता असलेली आणि स्वस्त अशा आरोग्यसेवेची निर्मिती करूयात”

“Let us work together in providing the poor, quality and affordable healthcare”

इंग्लिस मधल्या एका “ , “ कॉमाने किती मोठा घोळ घातलाय बघा राव. आता शेवटी मानुस हाय, अशा चुका तर होनारच. आम्ही काय म्हनतो त्या शशी थरूर तात्यांकडे पंतप्रधान ऑफिसवाल्यांनी क्लासेस लावले पायजे. म्हणजे कसंय ना त्यांचं इंग्लिस सुधारेल...

बाकी या विरामचिन्हांना जपलं पाह्यजे बरं.. आठवतंय का, एका नसलेल्या स्वल्पविरामामुळं तेरा लाख डॉलरचा फटका बसला हुता त्ये ?

एक स्वल्पविराम की किमत तुम क्या जानो रमेशबाबू... इथे तर याची किंमत १३ लाख डॉलर आहे !

सबस्क्राईब करा

* indicates required