अंबानी पुत्रांना खाऊसाठी किती पैसे मिळायचे माहित आहे का ?

आई आपल्याला लहानपणी खाऊसाठी पैसे द्यायची. कधी कधी आपण ते पैसे खर्च करायचो तर कधी ते साठवून ठेवायचो. हे पैसे असायचे १ रुपये २ रुपये किंवा फार फार तर ५ रुपये. हे झालं सामान्य मुलांचं. पण इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या अंबानी कुटुंबात जन्मलेल्या मुलांना अशीच ‘पॉकेट मनी’ मिळत असावी का ? मिळत असेल तर किती असेल ब्वा ?... हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मंडळी याबद्दल नीता अंबानी यांनी एक खुलासा केलाय. चला जाणून घेऊया काय आहे ते गुपित !!

iDiva या वेबसाईटला दिलेल्या इंटरविव मध्ये नीता अंबानी यांनी मुलांच्या 'पॉकेट मनी' बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितल्या प्रमाणे लहानपणी तिघांना खाऊसाठी फक्त ‘५ रुपये’ दिले जायचे.... राव, तुम्ही बरोबर ऐकलंत...फक्त ५ रुपये !! विश्वास बसत नाहीये ना ?


स्रोत

तर, प्रत्येक शुक्रवारी या तीनही मुलांना ५ रुपये खाऊसाठी मिळायचे. नीता अंबानी सांगतात त्या प्रमाणे एकदा तर ‘अनंत अंबानी’ त्यांच्या जवळ पळत आला आणि त्याने सांगितले की शाळेत मुलं त्याला चिडवतात ‘तू अंबानी का बेटा हें या भिकारी का ?’. यावर त्याने त्या दिवशी आईकडून १० रुपये मागितले होते !!

मंडळी अंबानी घराण्याची मुलं म्हटल्यावर आपण ज्या कल्पना केलेल्या असतात तिथे हे '५ रुपये' कुठेच फिट बसत नाहीत. आता याला ‘कंजूस’ म्हणावं की ‘काटकसर’ ते तुम्हीच ठरवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required