अनलिमिटेड मजा कंटिन्यू होईंगा- मुकेश अंबानी

सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या ‘रिलायंस जिओ’नं फुकटच्या इंटरनेटचा  डिसेंबरपर्यंतच असलेला कालावधी मार्चपर्यंत नेला होता. आणि आज आलीय रिलायन्स जिओ प्राईम खबर..  

"अनलिमिटेड मजा कंटिन्यू होईंगा" असं म्हणत मुकेश अंबांनींनी एक प्राईम ऑफर आणलीय.  या योजनेद्वारे सध्या ३१ मार्चपर्यंत फ्री असलेलं रिलायन्स जिओचं कनेक्शन आणखी एक वर्ष, म्हणजेच मार्च २०१८ पर्यंत वापरता येणार आहे. फक्त त्यासाठी वन टाईम फी म्हणून रूपये ९९ फक्त भरावे लागणार आहेत. हे ९९ रूपये १ मार्च ते  ३१ मार्च या कालावधीत भरायचे आहेत. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन १ मार्चपसून चालू होईल अशीही अंबानी यांनी घोषणा केली आहे.  हे रजिस्ट्रेशन रिलायन्सच्या शोरूममध्ये किंवा जिओ ऍप या दोन्ही ठिकाणी करता येणार आहे. 

काय आहे ही प्राईम ऑफर?

सध्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिवसाला १जीबी डेटा फ्री आहे. ही स्कीम अशीच चालू राहावी म्हणून वन टाईम फी ९९ रूपये भरायचे.  आणि मग दर महिन्याला ३०३रूपये  भरले, की दररोज १ जीबी असा महिन्याचा ३०जीबी डेटा वापरता येईल. तो ही ४जी कनेक्शनच्या स्पीडमध्ये. सध्याचे इतर कंपन्यांचे रेट्स बघितले, तर ३जी डेटाच्या १ जीबीसाठी किमान २५०रूपये मोजावे लागतात. त्यामुळं ३०३रूपयांत ३० जीबी म्हणजे ग्राहकांची चांदीच आहे!!

--यावर्षीच्या १ एप्रिलपासून रिलायन्सच्या वॉईस कॉलसाठी त्यांच्या ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र सध्या कोणत्याही नेटवर्कवर केला जाणारा कॉल फ्री असेल.

-- इतर नेटवर्कसोबतची स्पर्धा पाहता, रिलायन्स इतरांच्या तुलनेत २०% अधिक डेटा देईल. 

-- जिओ ते जिओ कॉलिंग लाईफटाईम फ्री असणार आहे.

तुमच्याकडे 3G मोबाईल आहे? आता तुमच्यासाठी जिओ आणतंय नवी खुशखबर...

सबस्क्राईब करा

* indicates required