मरून जिवंत झालेला अंडरटेकर रिटायर झाला ही पण अफवा आहे काय?

टीव्हीवर काहीतरी चालू असतं, एक आफ्रिकन जाडा माणूस एका चौकोनी स्टेजवर असतो, अचानक लाईट्स जातात, अंधार होतो आणि एक घंटा वाजते. एक उंच धिप्पाड माणूस स्टेजकडे येतोय आणि दुसरा माणूस भूत बघितल्यासारखं त्याच्याकडे बघतोय. सगळं स्टेडियम वेडं झालंय. अंडरटेकरबद्दल ही तुमचीही कदाचित पहिली आठवण असावी.  WWE चा हा प्रकार खोटा असतो हे काळायच्याही आधीची ही आठवण आहे.

लै भारी दिवस होते ते, सगळं काही खरं वाटायचं.. अंडरटेकर स्मशानात राहतो, तो मरून जिवंत झालाय, त्याने स्वतःला जाळून घेतलंय,  त्याच्या भावाचं नांव केन आहे, पॉल बेरर नावाचं पांढर भूत त्याचा बाप आहे, अशा एक नाही तर अनेक स्टोरीलाईन्स लै भारी असायच्या राव...

अंडरटेकर  रिंगमध्ये हेss धपाधप मार खायचा. आता तो हरणार असे वाटतं नाही वाटतं तोपर्यंत अचानक जेव्हा उठून बसायचा तेव्हा विरोधकांचे भाव मस्त असायचे. चोक स्लॅम, टुंब स्टोन पाईल ड्रायव्हर सारखे त्याचे मूव्हज आजही आठवतात. पण जेव्हा तो आपल्या प्रतिस्पर्ध्याला घेऊन कॉर्नरवर चढायचा आणि नंतर त्या रोप वर जो चालायचा ना भौ, तो आपल्यासाठी सिग्नेचर मूव्ह होता.

जस-जसं वय वाढत गेलं तसं तसं या खोट्या  मारामाऱ्या बघण्यातला इंटरेस्ट कमी झाला. मग एखादा दुसरा व्हिडीओ समोर आला तर बघितला जायचा, कुठे तरी काही तरी बातमी वाचून कळलं की अंडरटेकर आता wrestemenia मध्ये undefeated नाहीय. काल म्हणे तो दुसऱ्यांदा wrestemenia मध्ये हरला. हा त्याचा शेवटचा सामना होता. त्यानं रिटायरमेंट घेतलीये, WWE खोटं असेल, स्पोर्ट्स एंटरटेनमेंट असेल पण जवळजवळ तीन दशकं परफॉर्म करणं सोपं नाहीय. म्हणूनच आज परत एकदा मला अंडरटेकरला रोप्सवर चालताना बघायचं आहे..

तुमच्या काय आठवणी आहेत WWE आणि अंडरटेकरच्या? आम्हांलाही सांगा...

सबस्क्राईब करा

* indicates required