computer

जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेल्या सर्वात श्रीमंत भारतीय महीला !

फोर्ब्सकडून जगातल्या आणि भारतातल्या श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी हे गेली काही वर्षे निर्विवाद पहिल्या स्थानी आहेत. पण भारतात श्रीमंत लोकांच्या यादीत महिलाही काही मागे नाहीत. या यादीत अनेक भारतीय महिलांचा वरच्या स्थानी समावेश आहे.

१) सावित्री जिंदाल

सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. या यादीत त्यांचा क्रमांक हा सातवा आहे. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन आहेत. २०२० साली त्यांची संपत्ती ही ६.६ अब्ज डॉलर्स होती. २०२१ मध्ये वाढून ही संपत्ती १८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. जिंदाल ग्रुप हा स्टील, पॉवर, सिमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात आहे.

२) विनोद राय गुप्ता

विनोद राय गुप्ता या फोर्ब्सच्या यादीत २४ व्या स्थानी आहेत. २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७.६ अब्ज डॉलर्स आहे. तर २०२० साली त्यांची संपत्ती ३.५५ अब्ज डॉलर्स होती. त्यांच्या परिवाराचा हॅवेल्स इंडिया या कंपनीत मालकी हक्क आहे. ही कंपनी इलेक्ट्रिकल पासून अप्लायन्सेस बनवते.

३) लीना तिवारी

लीना तिवारी फोर्ब्सच्या या यादीत ४३ व्या स्थानी आहेत. त्यांची श्रीमंती ही ३ अब्ज डॉलर्सपासून वाढून ४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. लीना तिवारी या फार्मा कंपनी यूएसवी इंडियाच्या प्रमुख आहेत. त्यांचे वडिल विठ्ठल गांधी यांनी १९६१ मध्ये रेवलोन सोबत मिळून कंपनीची स्थापना केली होती.

४) दिव्या गोकुळनाथ

या यादीत ४७ व्या क्रमांकावर बायजूजच्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ आहेत. फोर्ब्सनुसार सध्या त्यांची संपत्ती ही ४.०५ अब्ज डॉलर्स एवढी आहे.

५) किरण मुजुमदार शॉ

फोर्ब्सच्या यादीतील पुढचे नाव आहे किरण मुजुमदार शॉ यांचे. त्या या यादीत ५३ व्या स्थानी आहेत. गेल्यावर्षीच्या मानाने त्यांची संपत्ती घटली आहे. त्या बायोफार्मास्यूटीकल कंपनी बायोकॉनच्या संस्थापक आहेत.

६) मल्लिका श्रीनिवासन

मल्लिका श्रीनिवासन या यादीत ७३ व्या क्रमांकावर आहेत. आजच्या घडीला त्यांची संपत्ती ही २.८९ अब्ज डॉलर्स आहे. त्या १९६० साली सुरू झालेल्या ट्रॅक्टर्स आणि एंड फार्म इंडिया लिमिटेडच्या चेयरमन आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required