f
computer

थोडक्यात वाचा जयललितांचा जीवनप्रवास : काही दुर्मिळ छायाचित्रे...

तामिळनाडू म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या जयललिता. आपल्या राज्याचा चेहरामोहरा बदलणार्‍या, गोरगरिबांचा आधार आणि सार्‍या महिलावर्गाची जणू आई असणाऱ्या या अम्माचं सोमवारी रात्री निधन झालं. पाहूया थोडक्यात त्यांचा जीवनालेख... 

जयललितांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी कर्नाटकातील मेलूरकोट गावात झाला. 

जयललिता २ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडीलांचं निधन झालं. त्यानंतर जयललिता त्यांच्या आईसोबत बंगळुरूमध्ये आल्या. बंगळुरूमध्ये त्यांच्या आई 'संध्या' या नावाने चित्रपटात काम करू लागल्या आणि जयललितांना सुद्धा त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी राजी केलं. 

जयललिता यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून कन्नड चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तमिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी अशा जवळपास ३०० चित्रपटांत काम केलं. 

त्यावेळचे प्रख्यात तमिळ अभिनेता एम. जी. रामचंद्रन यांनी जयललितांना राजकारणात आणलं. जयललितांनी चित्रपटात सर्वात जास्त काम रामचंद्रन यांच्यासोबतच केलं होतं. त्यांनी १९८२ मध्ये अण्णा द्रमुक पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं.

काही काळानंतर रामचंद्रन आणि जयललिता यांच्यात मतभेद निर्माण झाले. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर रामचंद्रन यांच्या पत्नीचा वेगळा आणि जयललितांचा वेगळा असे अण्णा द्रमुक पक्षाचे दोन तुकडे पडले. 

जयललिता यांनी स्वतःला रामचंद्रन यांची उत्तराधिकारी घोषित केलं आणि १९८८ मध्ये त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष बनला. १९९१ मध्ये त्या तामिळनाडूच्या पहिल्या निर्वासित मुख्यमंत्री बनल्या.   जयललिता यांनी आतापर्यंत ६ वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. याकाळात त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार आले. पण त्यांच्या लोकप्रियतेत तसूभरही कमतरता दिसली नाही. 

अशा या गोरगरिबांच्या महान *अम्मा* ला बोभाटा.कॉमकडून मनःपूर्वक श्रद्धांजली....

सबस्क्राईब करा

* indicates required