युरोप आणि बारामतीचं नातं माहित आहे का ?

भारतात अनेक स्थलांतरीत पक्षी येतात. हे पाहुणे आपल्या देशात आले की त्यांचा थवा पाहण्यास गर्दी होते. हल्लीच्या प्रदूषणामुळे या पक्ष्यांवर त्याचा परिणाम झाला असला तरी आजही हे पक्षी भारतात येतात. याच परदेशी पाहुण्यांमध्ये एक पाहुणा असतो ‘भोरड्या’ पक्षी. हा पक्षी एक नसून त्याचा हजारोंचा थवा असतो. हा थवा आकाशात जेव्हा नृत्य करतो तो पाहण्यासारखा सोहळा असतो भाऊ. खालील व्हिडीओ मध्ये तुम्ही हे पाहू शकता.

भोरड्या बद्दल थोडक्यात

स्रोत

भोरड्या पक्षाचं मूळ हे युरोप, रशिया, पश्चिम मध्य आशिया फिनलंड या प्रदेशात आहे. बारामती भागात या पक्षाला गुलाबी मैना म्हटलं जातं. भारतात हा पक्षी जुलै पासून येत असला तरी महाराष्ट्रात मात्र तो यायला नोव्हेंबर उजाडावं लागतो. या पक्षांचा हजारोचा थवा महारष्ट्रातल्या बारामती भागात पाहायला मिळतो.

हा पक्षी ज्या भागातून भारतात येतो त्या भागात कडाक्याची थंडी पडते आणि अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे या प्रदेशांच्या मानाने अनुकूल तापमानाच्या प्रदेशात हा पक्षी स्थलांतरित होतो. या पक्षांचा प्रवास देखील एक आश्चर्यच म्हणावं लागेल. कारण २० हजार पेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर पार करून ते भारतात येतात. प्रवास एकत्र केल्याने त्यांची उर्जा वाचते तसेच वेगही वाढतो.

स्रोत

भोरड्या पक्षी शेतातील कीटक, वड-पिंपळ वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांतला मध आणि ज्वारी, बाजरी सारखी पिकं खातो. शेतकऱ्यांना या पक्षांचा मोठा त्रास होतो. पण या पक्षांबद्दल एक वेगळी आपुलकी शेतकऱ्यांमध्ये आहे. पिकं खात असली तरी यांच मोठ्या प्रमाणातील अन्न हे शेतातील कीटक असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होतो.

पिढ्यानपिढ्या हा पक्षी भारतात येत आहे त्यामुळे त्याला परदेशी पाहुणा म्हणनं थोडं चुकीचं होईल. खरं तर तो आता भारताचा आणि महाराष्ट्राचा एक भाग झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required