computer

रेल्वेचा तिकीट चेक करण्याचा नियम तुम्हांला माहित हवाच. हा तुमचा हक्क आहे..

रेल्वेचा प्रवास कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल या विचारात सध्या रेल्वे प्रशासन आहे, आणि त्याचमुळे रेल्वे सतत नवनवीन पाऊल उचलत आहे. तसेच नविन नियम पण बनत आहेत. अशाच एका नियमाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत राव!! 

मंडळी बऱ्याचवेळा तुम्ही पाहिले असेल की स्टेशन्सवर किंवा रेल्वेत आरपीएफचे कर्मचारी तिकीट चेक करताना दिसतात. त्यांना तिकीट चेक करण्याच्या कुठलाच अधिकार नाहीये, त्यांचे काम रेल्वेत सुरक्षा ठेवणे आहे. तिकीट फक्त टिसी चेक करू शकतो. तुमच्याकडे तिकीट नसेल तरी तुमच्याकडून दंड वसूल करण्याचा अधिकार आरपीएफला नाही. बऱ्याचवेळा तिकीट नसले की दंडच्या नावाखाली पैसे वसूल करताना असे अधिकारी दिसतात. दंड वसूल करण्याचा अधिकार सुद्धा टीसीलाच आहे. पुढच्या वेळी ते जेव्हा तिकीट मागतील तेव्हा त्यांना तिकीट दाखवायची गरज नाहीये. जर त्यांनी काही बळजबरी केली तर त्यांची तक्रार तुम्ही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता. 

तक्रार कशी कराल...

- इंडियन रेल्वेने याप्रकारच्या तक्रारींसाठी इमर्जन्सी नंबर दिलेला आहे. रेल्वे प्रवासी 155210 या नंबरवर कॉल करून तक्रार करू शकतो. या टोल फ्री नंबरवर तुम्ही 24 तासात केव्हापण तक्रार करू शकता. 
- रेल्वेने 9717630982 हा एसएमएस नंबर पण तक्रारीसाठी दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही एसएमएस करून तक्रार करू शकता.
- गुगल प्ले स्टोरवरील इंडियन रेल्वेचे ऑफिशियल ऍप इंडियन 'रेल्वे सीओएमएस मोबाईल ऍप' डाउनलोड करून पण तुम्ही तक्रार करू शकता. 
- त्याचप्रमाणे रेल्वेचे अधिकृत ट्विटर हँडल @railminindia आणि फेसबुक पेज railminindia वर पण तुम्ही तक्रार करू शकता. 

मंडळी अशा प्रकारच्या तक्रारीनंतर जर रेल्वे पोलिस खरच तिकीट चेकिंग करत होता किंवा त्याने दंड वसूल केला आहे असे आढळून आले तर त्याला सस्पेंड सुद्धा केले जाऊ शकते. 

अजुक एक रेल्वेचा नियम असा आहे की रात्री 10 वाजल्यानंतर टीसीसुद्धा तुमचे तिकीट चेक करू शकत नाही. मंडळी टीसीला सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत तिकीट चेक करण्याची परवानगी असते. त्यानंतर प्रवासी झोपलेले असतात असे रेल्वेने गृहीत धरून याकाळात त्यांना डिस्टर्ब करू नये अशा गाईडलाईन्स रेल्वेने जारी केल्या आहेत. पण मंडळी त्यासाठी तुमचा प्रवास रात्री दहाच्या आधी सुरू झालेला हवा, 10 वाजल्यानंतर प्रवास सुरु झालेल्यांना हा नियम लागू होत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required