वाळंवटात वाहणाऱ्या वाळूच्या नदीचे रहस्य : व्हीडीओ

Subscribe to Bobhata

गेल्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तुम्ही पाहीलं असेल की ओसाड पडलेल्या वाळंवटातून भलीमोठी नदी वाहत आहे. तीही पाण्याची नव्हे, वाळूची... 

हा व्हिडीओ  आहे इराकमधला. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की खरंच, वाळूचीही नदी असते का?  उत्तर आहे 'नाही'. या दृष्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे...

वाळवंटी प्रदेशातील वातावरणात सतत वेगवेगळे बदल होत असतात. कधीकधी तिथलं तापमान अतिशय खाली जातं आणि जोराच्या पावसासोबत गारा पडतात. एखाद्या उंचावरच्या ठिकाणी अशा गारांचा पाऊस पडला की या सर्व गारा उताराच्या दिशेने एकत्र वाहू लागतात. आणि या गारांना वाळू चिकटल्यामुळे आपल्याला ती वाळूची नदी असल्यासारखी भासते. पण बर्फाचा हा प्रवाह थोड्याच अंतरापर्यंत वाहून संपून जातो.. 

अशी नदी इराक, इस्राईल, सौदी, जॉर्डन अशा ठिकाणी दिसते पण तीही क्वचितच. मग, कळलं ना यामागचं सायन्स?  करा मग शेअर!!

सबस्क्राईब करा

* indicates required