computer

नंदुरबारच्या दुर्गम भागात एकच दिवशी ४८३ रुग्णांना बरा करणारा देवदूत !!

सरकारी डॉक्टर खुप कामचुकार असतात ही तक्रार आपण नेहमी ऐकत असतो. मुळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याबद्दल कुणाच्याही मनात चांगली भावना नसते. त्यात सरकारी डॉक्टर म्हणजे जिथे नोकरी आहे तिथल्या सरकारी दवाखान्यात हजेरी लावून स्वतःचा खाजगी दवाखाना चालवून डबल पैसा छापणारे हेच एकंदरीत चित्र सगळ्यांच्या मनात असते.

पण अशा वातावरणात काही लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुर्गम म्हणून ओळखला जातो, त्यातही धडगाव तालुका म्हणजे अतिदुर्गम तालुका. तिथे आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आदिवासी बहुसंख्याक असलेल्या या तालुक्यात नेते, अधिकारी सर्वांचेच तसे दुर्लक्ष!!

उपचाराअभावी मृत्यु होणे ही गोष्ट तिथे नविन नाही. पण गेल्या आठवड्यात एक अभिमानास्पद गोष्ट घडली राव!! धडगाव ग्रामीण सरकारी दवाखान्यात ८ सरकारी डॉक्टर आहेत, त्यातले ७ त्यादिवशी गैरहजर होते. एकमेव डॉक्टर संतोष परमार त्यादिवशी ड्युटीवर उपस्थित होते. 

मंडळी त्या एकाच दिवसात त्यांनी तब्बल ४८३ लोकांवर उपचार केले. त्या एकाच दिवसात त्यांनी सापाने चावलेले रुग्ण, अपस्माराचे रुग्ण, तसेच दोन पोस्टमॉर्टेमचेसुद्धा नेतृत्व केले. त्याचबरोबर त्या एका दिवशी त्यांनी पांच बाळांना जन्म दिला. ही गोष्ट सामान्य वाटत असेल तर इतर ७ डॉक्टर्स बरोबर जर संतोष परमारही गैरहजर असते तर काय झाले असते याचा विचार करा!!!

धडगावच्या डोंगराळ भागात असलेल्या या दवाखान्यात आजूबाजूच्या परिसरातल्या जवळपास १५० गावांतले लोक उपचारासाठी येत असतात. या दवाखान्यात ४५० ते ५०० रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात. खासगी डॉक्टर्सने एका दिवसात इतके पेशंट तपासणे यात काही विशेष नाही, कारण त्याचे त्यांना पैसे मिळणार असतात. पण सरकारी डॉक्टर्सची अनास्था नविन नाही. अशावेळी दवाखान्यात कुणीही उपस्थित नसताना सर्व पेशंट तपासणे म्हणजे मोठी गोष्ट आहे राव!!

मुळात सरकारी कर्मचाऱ्याचे आपले काम बजावणे हे कर्तव्य आहे. पण आपली नोकरशाही एवढी आळशी आहे की कोणी प्रमाणिकपणे काम केले की त्याची बातमी होते. मंडळी, धडगावसारख्या दुर्गम भागात एवढी मोठी घटना घडून गेली, पण त्याची दखल महाराष्ट्रातल्या एकाही वृत्तपत्राने घेतली नाही. इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आल्यावर सर्वाना या घटनेची माहिती झाली. 

त्या कर्तव्यदक्ष डॉक्टरची माहिती महाराष्ट्रात सर्वांपर्यत पोहोचावी म्हणुन बोभाटाकडून हा छोटासा प्रयत्न आहे..

(डॉक्टर संतोष परमार)

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required