समुद्र आटून तिथे बनलं एक वाळवंट.. पाहा बरं हा समुद्र कोणता आहे ते?

पर्यावरणाचा ऱ्हास आणि आणि जागतिक तापमानवाढ ही मोठी समस्या सध्या भेडसावत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हे त्याचेच एक उदाहरण. दुष्काळात नदी, विहिरी, तलाव कोरडा पडण्याबद्दल तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण जर एखादा समुद्र कोरडा पडून त्याचं वाळवंट झाला असेल तर? ही कोणतीही कवी कल्पना नाही. ’अरल समुद्र’ असे त्या समुद्राचे नाव आहे. हा समुद्र कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्या सीमेवर आहे. नासाने प्रसिद्ध केलेल्या अरल समुद्राच्या छायाचित्रात मागील दशकात झालेले भयानक बदल स्पष्ट दिसतात.

अरल समुद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या नद्या म्हणजे ’सिर दर्या’ आणि ’अमु दर्या’. १९६० साली सोव्हियत रशियाने या नद्यांचे प्रवाह बदलून सिंचन प्रकल्पाकडे वळवले तेव्हापासून मुळात ६८ हजार चौ. किमी असणारा अरल समुद्र कोरडा पडून त्याचे वाळवंट झाले आहे. अरल समुद्र हा इतर  बाकी समुद्राप्रमाणे दुसऱ्या समुद्राला जोडलेला नाही.  त्यामुळे पाणी फक्त नद्यांमार्फत येत होते. पण त्या नद्यांचं  पाणी आता समुद्राला मिळत नसल्याने संपूर्ण समुद्रच आक्रसून गेला आहे. चित्रात दिसत असल्याप्रमाणे उत्तरेचा काही भागातच पाणी शिल्लक राहिले आहे.

अरल समुद्र हा चौथा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा जलाशय होता (प्रत्येक लिटर मागे १० ग्रॅम मीठ. या समुद्रावर अवलंबून असलेले जनजीवनही विस्कळीत झाले आहे. समुद्रच नसल्याने मासेमारी व्यवसाय संपुष्टात आला. तिथल्या पर्यावरणावरही याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळा वाढला आहे तर हिवाळा जास्त कोरडा झाला आहे.

माणसाने निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ केल्यावर काय परिणाम होतात हे अरल समुद्रावरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही समस्या लक्षात घेता आपण सर्वांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे नाही तर अरबी समुद्र कोरडा पडल्यावर काय होईल याबद्दल आपण कल्पना करू शकतो..

सबस्क्राईब करा

* indicates required