शोभा डे ने ट्वीट केलं आणि या पोलिसाचं आयुष्यच बदललं. पटापट बघा आता हा दिसतो कसा...

काय मंडळी, तुम्ही हे वाचताय म्हणजे तुम्हाला हा फोटो आठवतोय. काय, नाही आठवत म्हणताय? चला तर मग, आम्ही तुम्हाला एक पूर्वसूत्र म्हणजेच रिकॅप देतो. तर झालं असं होतं, मुंबईतल्या निवडणुकाच्या वेळी शोभा बाई डे यांनी एक ट्वीट केलं होतं आणि त्यात म्हटलं होतं, "मुंबईत भारी पोलीस बंदोबस्त"! सोबत हा फोटो जोडला होता. तुम्ही असलं ट्विट केलं तर मंडळी ट्विपल्स तुम्हाला सोडणार आहेत का?? तर या पोलिसाच्या आकारामानावर केलेला विनोद जनतेला नाही आवडला. आणि  त्यांनी शोभा बाईंना लाथाड लाथाड लाथाडले.

पण आता कहाणी मे ट्विस्ट आलाय. दौलतराम जोगावत यांना अनेक आजार होते. त्यामुळं त्यांचं पोट सुटलेलं होते.  तर आता शोभाबाईंचं ट्विट त्यांनी फार मनावर घेतले आणि वजन कमी करायचं ठरवलं. त्यांना या कामात मदत करायचं ठरवलं मुंबईतल्या प्रसिद्ध barriatic सर्जन मुज्जफल लकडावला यांनी. दौलतारामचं ऑपरेशन याच  डॉक्टरांनी केलं. फोटोच्या वेळी 180 किलो असणारं दौलतरामचं वजन आता तब्बल 65 किलोनी कमी केलंय आणि आता अजून 30 किलोने कमी करायचं आहे.  डॉक्टरांनी या ऑपरेशनचे पैसे पण घेतले नाहीत. यासाठी दौलतारामने स्वतःच्या सवयी खूप बद्दलल्यात असं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

एकूणच आपल्यावर झालेली टीका इतक्या पॉझिटिव्हली
घेण्याच्या घटना फार कमी आपल्या आसपास दिसतात. दौलतारामला आता शोभा डेंची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानायचे आहेत. त्याची इच्छा लवकर पूर्ण व्हावी. दौलतारामला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सगळेच देऊयात. तसेच तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आम्हाला पण कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required