आता रेल्वेने मराठीलाही पायदळी तुडवले !!

सांताक्रूझ, एल्फिन्स्टन, गोरेगाव स्थानकांच्या जिन्याच्या पायऱ्यांवर मराठीत काही वाक्य लिहिली आहेत. पायऱ्यांवरून चालताना ही वाक्य आपल्याला दिसतील. या वाक्यांना बघून तुमचा तोल सुटण्याची शक्यता आहे. म्हणून सावधान रहा.

मंडळी, ही वाक्य काय आहेत ? “कृपया लहान चेंडू घेऊ नका”, ”कृपया एकतर बाजूला ठेवा.”, “कृपया घसरनारी बुटे वापरू नका.”

स्रोत

स्रोत

स्रोत

तुम्ही आधी थोडं गोंधळात पडाल पण नंतर लक्षात येईल की ही सगळी कृपा आहे गुगल ट्रान्सलेशनची. मंडळी, इंग्रजी सूचनांच मराठीत भाषांतर करण्याच्या नादात पश्चिम रेल्वेने हा खुळचटपणा केला आहे. पश्चिम रेल्वे विभागाबरोबरच एका सामाजिक संस्थेचं देखील यात योगदान असल्याचं म्हटलं जातंय. पण प्रश्न असा पडतो की हा प्रकार घडत असताना रेल्वे विभागातील कुणालाही याची जाणीव झाली नाही का ?

तुम्ही गुगल ट्रान्सलेशन मध्ये खालील वाक्य टाईप केलीत तर येणारा रिझल्ट पायऱ्यांवरच्या वाक्याशी मिळतं जुळतं असल्याचं दिसेल.
उदाहरणार्थ,

“please do not take short cuts” = “कृपया लहान चेंडू घेऊ नका.”
“Please keep aside either” = “कृपया एकतर बाजूला ठेवा.”
“Please don’t drop a step” = कृपया एक पाऊल वगळू नका”

याबद्दल पश्चिम रेल्वे विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि लवकरच यात सुधारणा होण्याचं म्हटलंय. पण हा सगळा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झालाय ना राव. लोकांनी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून याचा मस्त समाचार घेतलाय.

काय आहे ना भाऊ, एवढी कामं पडलेली असतात त्यात हे भाषांतराचं काय घेऊन बसलाय. आता गुगल छानपैकी भाषांतर करत असताना आपण त्यात डोकं का घालावं. बहुतेक असा समाज रेल्वेवाल्यांचा झाला असावा.

यावर तुमचं मत सांगायला विसरू नका राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required