साधी राहणी आणि उच्च विचारसरणी...आमटे कुटुंबाकडून बरंच शिकण्यासारखं आहे !

भारताची ओळख जगभरात ज्या काही  व्यक्तींमुळे आहे, त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे बाबा आमटे आणि प्रकाश आमटे. बाबा आमटेंनी सुरु केलेलं समाजकार्य पुढे न्यायचं काम डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. विकास बाबा आमटे यांनी केलं. आनंदवन आणि हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प असो किंवा आपल्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देणं असो, आमटे कुटुंब आपल्या कार्यासाठी जसं ओळखलं जातं तसचं त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ‘साधेपणा’. या साधेपणाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे मंडळी...


वरील फोटोत प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे मुंबई विमानतळाबाहेर जेवताना दिसत आहेत. घरातून आणलेला डबा तेवढा त्यांच्या पुढ्यात दिसतोय. खरं तर कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन जेवणं त्यांना सहजसोप्पं होतं, पण घरून आणलेला डबा त्यांनी खाणं पसंत केलेलं दिसतंय.

हा फोटो फेसबुकवर शेअर केलाय अमर घाटपांडे यांनी. ८५० पेक्षा जास्त लाईक्स आणि ४०० पेक्षा जास्त लोकांनी या फोटोला शेअर केला आहे. प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, त्यांच्यावर चित्रपट देखील येऊन गेला.  पण तरीही ते कोणत्याही प्रसिद्धीपासून लांबच राहिले. हा फोटो देखील त्यांच्या नकळत काढलेला दिसत आहे.


साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणतात ना ते हेच !!

सबस्क्राईब करा

* indicates required