सीमेवर वातावरण तापलंय...शाहीर दादा कोंडके यांचा 'चीनी आक्रमणाचा फार्स' ऐकायलाच हवा !!

दोन दिवसांपूर्वी झालेल्या सीमेवरच्या चिनी गुंडागर्दीनंतर बर्याच जणांना १९६२ सालच्या भारत -चीन युध्दाची आठवण झाली असेल. पण बहुतेकांना ही आठवण केवळ पाठ्यपुस्तकातील नोंद म्हणूनच आठवत असेल.आमचापैकी कोणाचाही म्हणजे बोभाटाच्या व्यपस्थापकीय सभासदांचाही तेव्हा जन्म झाला नव्हता. पण वाचकहो, त्या कठीण काळात सर्वसामान्य जनतेचे आत्मबल टिकवून ठेवण्याचे काम महाराष्ट्राच्या शाहीरांनी केले. या शाहीरांपैकी लिलाधर हेगडे आणि दादा कोंडके यांनी अनेक 'चीनी आक्रमणाचा फार्स' या कार्यक्रमातून गायलेल्या पोवाड्यांच्या मूळ रेकॉर्ड बोभाटाचे मित्र श्री कमलेश सुतवणी यांच्याकडे होत्या. त्या सर्व पोवाड्यांचे डिजीटायझेशन करून त्यांनी त्या खास बोभाटाच्या वाचकांसाठी पाठवल्या आहेत.