स्टार्टअप ते राजकरण, वाचा अवघ्या २१ वर्षांच्या संपादक - प्रकाशकाच्या सृजन दिवाळी अंकात!

मराठी माणूस जाम धडपड्या असतो. सतत काही ना काही करण्याची ऊर्मी त्याच्यात असते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच एका धडपड्या मुलाच्या दिवाळी अंकाची ओळख. इतर दिवाळी अंकांप्रमाणे या अंकातही कथा, राजकारण, लेख वगैरे सगळं आहेच. आता त्याला गरज आहे वाचकांची आणि शुभचिंतकांची. म्हणूनच वानगीदाखल आम्ही या दिवाळी अंकातला एक लेख तुमच्यासमोर सादर करत आहोत.
दिवाळी आहे देशभर. सगळं काही भक्तीमय. सुजलाम सुफलाम वातावरण. त्यात विशेष करून व्यापारी वर्ग, जो लक्ष्मीपूजनाच्या पावनपर्वावर आई महालक्ष्मी आणि लाल रंगाच्या कपड्यात विणलेल्या, पिस्ता रंगाच्या कागदात जमलेल्या, खाता वहीच्या पूजनात मग्न असणार. पण आजही ही व्यापार व्यवहाररुपी लक्ष्मी अर्ध्या मराठी युवांच्या नशिबी नाही. कारण की व्यावहारिक प्रगल्भता आजसुद्धा मराठी तरुणात क्वचित सापडते. त्यावरून बदलता काळ आणि स्टार्टअपचे बदलते रूप.
सर्वप्रथम हे समजून घ्या की स्टार्टअप काय असतं? स्टार्टअप म्हणजे जी गोष्ट तुम्ही शोधली आहे अथवा समाजातील एका समस्येचे समाधान तुम्ही शोधून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही त्यास एक नियोजित व्यापारिक रूप देता, त्यास स्टार्टअप असे म्हणतात. एखाद्या ब्रँडची फ़्रेन्चाइज घेणे अथवा कुठेतरी चहाटपरी की वडापाव गाडी थाटणे म्हणजे स्टार्टअप नाही. स्टार्टअपची सुरुवात करण्याआगोदर समाजातील उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा, वस्तूंचा अभ्यास करावा लागतो. कोणत्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत, कोणत्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत आणि ज्या आहेत त्यांचा दर्जा काय आहे, मोल काय आहे, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का? की नवीन संशोधित गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच स्टार्टअपची संकल्पना उभी होते.
कृषी क्षेत्रात अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जे काही नवीन गोष्टींचे संशोधन केले आहे त्यात ते व्यवहारिक संकल्पना निर्माण करून सामान्य ग्राहकापुढे सोप्या पद्धतीने मांडून तुम्ही त्या गोष्टींचे स्टार्टअप निर्माण करता, यावर तुम्ही ५ ते ६ वर्ष केलेल्या अभ्यासाचा निकाल ठरतो. स्टार्टअप क्षेत्रात एक भौतिक संकल्पना आहे "तेच निर्माण करा जे विकू शकता, ते नको जे तुम्ही विकू शकत नाही", म्हणजेच तुम्ही काहीही निर्माण केले अथवा कोणत्याही क्षेत्रातील स्टार्टअपची निर्मिती केली तर ज्या वस्तू किंवा सेवेची निर्मिती आपण करत आहात त्याची विक्रीसुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे.
वरील सगळ्या गोष्टी म्हणजे स्टार्टअप क्षेत्राची तोंड-ओळख होती. पण स्टार्टअप बिझनेसची प्रत्यक्षात सुरुवात करण्याचे काही व्यवहारिक टप्पे आहेत आणि या टप्या - टप्याचा प्रवास पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात होणे शक्यच नाही. ही शालेय जीवनातील इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी..सारखी संकल्पना आहे म्हणून हे सर्व टप्पे मी आपल्या समोर सोप्या पद्धतीने मांडू इच्छितो.
स्टार्टअपची संकल्पना ही त्याची पहिली पायरी आहे. भारतीय बाजारपेठेतील ग्राहकाची मानसिकता ही इतर देशातील ग्राहकाच्या मानसिकतेपेक्षा खूपच वेगळी आहे. भारतीय ग्राहकाला कमी किमतीत, उत्तम दर्जाची आणि दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या वस्तू अथवा सेवेत जास्त रस असतो. याचे कारण की भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे - ज्यांची खरेदी क्षमता ही सामन्य प्रमाणात असते.
भारतातील प्रत्येक उद्योगाला या शेवटच्या टप्प्यापर्यंत असणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहचायचे असते; म्हणून तुमच्या स्टार्टअपची संकल्पना निर्माण करताना भारतीय बाजारपेठेच्या ग्राहकाला नजरेसमोर ठेउनच या संकल्पनेची निवड करा. संकल्पना निवडत असताना त्यावर तंत्रज्ञानाच्या बदलाचा जास्त विरोधी परिणाम होणार नाही या गोष्टीची दखल नक्की घ्या. सोबतच तुमच्या संकल्पनेला भविष्यकाळात वृद्धीची क्षमता असावी, याची काळजी नक्की घ्या. विशेष करून तुम्ही जी संकल्पना निवडली आहे ती याअगोदर बाजारपेठेत इतर स्टार्टअपनी अवलंबली आहे की नाही याची पळताळणी नक्की करून पहा.
दुसरा टप्पा निर्मिती नियोजनाचा. स्टार्टअपची संकल्पना ठरल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष निर्मितीचे नियोजन करणे गरजेचे असते. कारण या स्टार्टअपची नियोजनबद्ध मांडणीच तुम्हाला निर्मितीसाठीची गुंतवणूक, खर्च, वेळ, मनुष्यबळ, व्यवहार पद्धत, होणारा नफा, मासिक वार्षिक मिळकत खर्च, सोबतच गरजेचे तंत्रज्ञान याबाबत अचूक अंदाज बांधण्यास मदत होते. नियोजनबद्ध होणे म्हणजे स्टार्टअपच्या निर्मितीचा मार्ग ठरवणे असते.
तिसरा टप्पा आहे स्टार्टअपचे आर्थिक नियोजन. स्टार्टअप हा लघु आकाराचा उद्योग असतो. यात आर्थिक नियोजन ही सर्वप्रथम, मुलभूत गरज आहे. तुम्हाला लागणारी गुंतवणूक ही स्वतःची आहे की तुम्ही ती कर्ज स्वरूपात घेणार आहात, आर्थिक गुंतवणुकीचे टप्पे असतात. निर्मितीसाठीचा खर्च उपलब्ध असलेल्या आर्थिक जमवाजमवी मध्येच कसा करता यावा याचे नियोजन यात होणे गरजेचे असते. कामगारांना अथवा नेमलेल्या अधिकाऱ्यांना पगार, निव्वळ मासिक खर्च, विक्रीचे प्रमाण, निर्मितीचा खर्च, नफ्याची टक्केवारी या सगळ्या गोष्टी या आर्थिक नियोजनात बांधून घ्याव्या लागतात.

चौथा टप्पा आहे ऑपरेशन सिस्टम बनवणे. स्टार्टअपमार्फत ज्या सेवा-सुविधा, वस्तू पुरवल्या जाणार आहेत या कार्यप्रणालीचा आराखडा निर्माण करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुम्ही निर्मिती संकल्पनेचा आरखडा अचूक बांधू शकता. कोणत्या गोष्टीसाठी किती मनुष्यबळ लागेल अथवा कोणत्या गोष्टीच्या निर्मितीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाची गरज आहे, याचा अंदाज मिळतो. सोबतच या गोष्टीवर गुंतवणुकीचा किती भाग खर्च होणार याचाही अचूक अंदाज लावता येतो.
पाचवी गोष्ट वर्किंग हेरार्की. स्टार्टअपमध्ये काम आणि कर्मचारी, अधिकारी, संचालक अश्या प्रकारचे कार्यकारी स्तर निर्माण केले जातात. यातच ठरते कोणाचे अधिकार आणि कामाचे आकार किती आहे. यामुळे सर्व प्रणाली सुरळीत पार पाडण्यासाठी मदत होते.
चौथा टप्पा आहे ऑपरेशन सिस्टम बनवणे. स्टार्टअपमार्फत ज्या सेवा-सुविधा, वस्तू पुरवल्या जाणार आहेत या कार्यप्रणालीचा आराखडा निर्माण करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुम्ही निर्मिती संकल्पनेचा आरखडा अचूक बांधू शकता. कोणत्या गोष्टीसाठी किती मनुष्यबळ लागेल अथवा कोणत्या गोष्टीच्या निर्मितीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाची गरज आहे, याचा अंदाज मिळतो. सोबतच या गोष्टीवर गुंतवणुकीचा किती भाग खर्च होणार याचाही अचूक अंदाज लावता येतो.
पाचवी गोष्ट वर्किंग हेरार्की. स्टार्टअपमध्ये काम आणि कर्मचारी, अधिकारी, संचालक अश्या प्रकारचे कार्यकारी स्तर निर्माण केले जातात. यातच ठरते कोणाचे अधिकार आणि कामाचे आकार किती आहे. यामुळे सर्व प्रणाली सुरळीत पार पाडण्यासाठी मदत होते.
सहावा टप्पा आहे विक्री,जाहिरात आणि वृद्धी. तुमचा स्टार्टअप काय आहे आणि तो काय करतो आणि त्याचा ग्राहकाला काय फायदा आहे हे स्पष्ट आणि सोप्या भाषेत कलात्मक रित्या जाहिरातीच्या माध्यमातून निर्माण करावे लागते ज्यास "ब्रँड पोजिशनिंग" असे म्हटले जाते. यातूनच विक्रीची वृद्धी निर्माण होते आणि मागणी पुरवठेचा वर्तुळ आकार घेतो. सातवा आणि शेवटचा टप्पा आहे विकासाचे आणि बदलाचे नियोजन. म्हणजेच स्टार्टअपला एक विशिष्ट काळ उलटून गेल्यानंतर एका बदलाची गरज असते. याने नवीन ग्राहक आणि जुन्या ग्राहकांना आपल्या स्टार्टअप सोबत जोडून ठेवण्यास मदत होते. विस्तारीकरणाचा एक टप्पा हळू हळू पार पडतो.
याप्रकारे एका स्टार्टअपचा मुलभूत पाया रचला आणि चालवला जातो. कधीकधी स्टार्टअप एकट्यालाच अथवा भागीदारीत राहून करावा लागतो. पण स्टार्टअपमध्ये एक व्यक्ती चार काम करतो; याने मानवीसंसाधनाचा कमी वापर करण्याचा प्रयोग राबवला जातो. कारण की स्टार्टअपकडे सुरवातीच्या काळात खूप कमी गुंतवणूक असते आणि ते त्यांना सेवा अथवा वस्तूच्या विक्रीतून निर्माण करायची असते.

मराठी तरुणांनी एक विशेष बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. जर प्रत्यक्ष खरा स्टार्टअप करायचा असेल तर ते तुम्हाला पुस्तक वाचून, भाषण ऐकून, सोशल मिडीयावर हिंडून की कोणते महागडे कोर्सेस करून करता येणार नाही. यासाठी बाजाराचा आणि समाजातील अवती-भवतीच्या गोष्टींचा प्रत्यक्ष अभ्यास आणि संशोधन करावे लागते, त्यास व्यवहारिकरित्या अमलात आणावे लागते; तेव्हाच ते स्टार्टअप प्रत्यक्षात येते. स्टार्टअप हे वाचून-ऐकून नाही तर करूनच होणार आहे. म्हणून कोणत्याच आणि कसल्याच भूलथापांना बळी न पडता आपल्या स्टार्टअपची निर्मिती कार्य सुरु करावे आणि निर्मिती प्रक्रियेत फक्त तज्ञ व्यक्तीचाच सल्ला घ्यावा. जेणेकरून आपले प्रश्न सुटतील आणि स्टार्टअप निर्मितीचा मार्ग मोकळा होत जाईल.
आपणास हे लेख वाचून असे वाटत असेल की स्टार्टअप इतका सोपा आहे, तर इथे तुम्ही बळी पडता. स्टार्टअप शब्दामध्ये जितका सोपा दिसतो तितकाच स्टार्टअपचा मार्ग हा वेळखाऊ आणि कष्टाने भरलेला आसतो. पण एका छोट्याश्या आकाराच्या स्टार्टअपमुळे कमीत कमी १० बेरोजगारांना रोजगार आणि १०० स्टार्टअपमुळे एका राज्याच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठा बदल निर्माण होतो. आज अमेरिकेसारख्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा ६०% भाग हा स्टार्टअप क्षेत्राने तारला आहे. इस्रायल आणि जपानने स्वतःचा देश स्टार्टअपच्या जोरावर शक्तिशाली बनवला आहे. देशातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील बेरोजगारीला आळा घालायचा असेल तर आता मराठी तरुणाने राजकारणाचे नागडे भूत बाजूला सारत स्टार्टअपची कास धरावी, ही नम्र विनंती.
लेखक : समीर पूनावाला
संचालक - The Startup God
पुणे, महाराष्ट्र
संपर्क - ७७९६७३०७२७

आमच्या बोभाटाचा लेखक वैभव पाटील याने अवघ्या २१ व्या वर्षी यशस्वीपणे पहिलावहिला “सृजन” नावाचा दिवाळी अंक प्रकाशित केलेला आहे. त्याबद्दल वैभवचे अभिनंदन. तुम्ही वाचलेला वरील लेख हा या दिवाळी अंकातील एक लेख आहे. दिवाळीच्यानिमित्ताने वेगवेगळ्या विषयावरचे लेख आणि कथा वाचण्यासाठी हा अंक आजच मागवा.
आपला अंक कसा बुक कराल?

१. 9657525396 क्रमांकावर पेटीएम/गूगल पे/फोन पे वर 90 रुपये पाठवा.
२. सोबत पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट, तुमचं नाव व पत्ता 8007953256 या नंबरला व्हॉटसअॅप करा.
३. अंक पोस्टाने घरपोच पाठवण्यात येईल.