computer

या रखरखत्या उन्हात वैतागला आहात? उन्हाळ्यात बहरणार्‍या या पाच झाडांकडे पाहून नक्कीच आल्हाददायक वाटेल..

उन्हाळ्यातल्या रखरखीत दुपारी डोळ्यांना आणि वातावरणालाही शीतलता देतात ती आसपासची झाडे. आजकाल सिमेंटच्या जंगलांत अशा झाडांची संख्या कमी झालीय पण महानगरे सोडली तर बहुतेक गावांत रस्त्याकडेला अशी झाडं दिसून येतात. दरवर्षी उन्हाळा अधिकच तीव्र होतोय आणि निसर्गाचं चक्रही उलटसुलट झालंय. त्यामुळं पुढे चालून आहे  इतक्याच झाडांमुळे काही भागायचं नाही. आजोबाने लावलेल्या झाडांची फळं नातवंडे खात आहेत. आता त्या मोठ्या झालेल्या नातवंडांवर जबाबदारी आहे की त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी वृक्षलागवड करावी.

१. बहावा/अमलताश

इंदिरा संतांनी या बहाव्याच्या फुलोर्‍याला  ’सोनतोरण’ हे नांव बहाल केलंय. शिशिरातल्या पानगळतीमुळे जवळजवळ निष्पर्ण झाड आणि पिवळ्याधम्मक फुलांचे घोस. त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहावत नाही.

गुलमोहोर

उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी बहरलेल्या गुलमोहोराकडे पाहण्यासारखं सुख नाही. 

४. सोनमोहोर

दिसण्याच्या बाबतीत  सोनमोहोर हा गुलमोहोराचाच जुळा भाऊ. याचा पिवळेपणा धम्मकपणापेक्षा सोनेरीपणाकडे अधिक झुकतो

५. नीलमोहोर

हादेखील गुलमोहोर आणि सोनमोहोराच्याच रांगेतला पण भारतात तितकासा न आढळणारा वृक्ष. त्याच्या निष्पर्ण झाडावर निळ्या रंगाचे घोस भलतेच सुंदर दिसतात.

सबस्क्राईब करा

* indicates required