computer

हॉटेलच्या उद्घाटनाला १० रुपयांची बिर्याणी वाटली...पोलिसांनी तासाभरात हॉटेलला टाळं ठोकलं !!

सध्या सेलचा मोसम आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर सेल सुरू आहे. शहराशहरांमध्ये मोठे दुकानदार देखील आपल्या दुकानांवर सेल लावत आहेत. लॉकडाऊनमुळे गेले कित्येक महिने ज्यांना काही शॉपिंग करता आली नाही असे लोक या सेल्सवर उड्या टाकत आहेत.

तामिळनाडू येथील विरुधीनगर येथे जाहीर हुसेन नावाच्या तरुणाने नुकतंच छोटं हॉटेल उभारलं आहे. भावाने विचार केला की सगळीकडे सेल सुरू आहे आपण पण हॉटेलच्या उद्घाटनाला सेल लावून बघू. जाहीर हुसेन याने मग आपल्या दुकानाबाहेर पाटी लावली. १० रुपयांत बिर्याणी!! खाली टीप देखील लिहिली, ऑफर फक्त २ तासांसाठी आहे. लोकांना १० रुपयांत बिर्याणी मिळणार हे कळताच तसे लोकांचे तांडे त्याच्या दुकानाकडे वळले.

त्याच्या दुकानात तुफान गर्दी झाली. तुम्हांला वाटले असेल की या माणसाचा धंदाही तुफान झाला असेल. त्यालाही सेलची घोषणा करताना असेच वाटले असेल. पण लोक सोशल डिस्टन्सिंग तोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचे खापर जाहीर हुसेनवर फुटले.

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने बनवलेली बिर्याणी अर्धीच विकली गेली होती. अर्धी उरली असताना पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी त्याला उचलून आत टाकले. उरलेली बिर्याणी वाटून दिली. अशा पद्धतीने आयडिया केली आणि वाया गेली अशी परिस्थिती त्या बिचाऱ्या बिर्याणीवाल्याची झाली.

सबस्क्राईब करा

* indicates required