अरेरे! शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत हे काय केलं!! ते पण शाळेत ? 

शाळेत असताना आपल्याला स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची शिस्त लागावी म्हणून आपले आदरणीय मास्तर लोक नाना तर्‍हेचे प्रयत्न करत असतात.. प्रसंगी भयंकर वाटणार्‍या शिक्षाही देत असतात. पण नीट वागतील ती मुलं कसली ? स्वच्छता आणि शिस्तीचा कंटाळा असणाऱ्या अशाच काही जिद्दी विद्यार्थ्यांन्या एका अतिजिद्दी शिक्षिकेने धडा शिकवला. पण तो त्यांच्याच अंगलट आला.

          झालं काय, तर कर्नाटकातील बसवनबागेवाडी तालुक्यातल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ढवळगी नावाच्या शिक्षिका अध्यापनाचं काम करतात. मॅडमनी आठवीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांन्या त्यांचे वाढलेले केस कापून यायला सांगितलं. एक नाही,अनेकवेळा सांगितलं. पण पोरांचा अवतार जैसे थे. मग मॅडमना आला राग आणि मग मॅडमनी हातात घेतली कात्री... आणि कापले शाळेतच या ४ पोरांचे केस... हो हो.. शाळेतच !! 

         मग काय? झाला बोभाटा... संतप्त पालकांनी शाळेला जाब विचारला. मग मॅडमनी आपण शिस्तीवर कशी भिस्त ठेवतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी कसंबसं आपापसात हा वाद मिटवून घेतला. मॅडमनी केलेलं हे कृत्य कौतुकास्पद आहे की हास्यास्पद? काय वाटतंय तुम्हाला?

सबस्क्राईब करा

* indicates required