computer

किडनी विकून आयफोन घेतलेला तरुण सध्या काय करतोय ?

समाजात असलेल्या स्टेटससाठी लोक काय काय करतात हे आपण बघितले आहे. ॲपलचे प्रॉडक्ट हा ही एक स्टेट्स सिम्बॉलचा प्रकारच. ॲपलचे प्रॉडक्टस् महाग असतात हे सर्वांना माहीत आहे. ॲपल चांगली क्वालिटी देत असल्याने विकत घेणारे आणि आपल्याकडे ॲपल प्रॉडक्ट आहे अशी हवा करण्यासाठी ते विकत घेणारे असे दोन गट समाजात बघायला मिळतात.

मात्र या सगळ्या वस्तू बऱ्याच महाग असतात हे ही तितकंच खरं. त्यामुळे त्या विकत घेण्यासाठी किडनी विकावी लागेल या अर्थाचे अनेक मीम्स तुमच्या वाचनात आले असतील. अर्थात मीम हा विनोदाचा भाग झाला. साहजिकच ॲपल प्रॉडक्टस म्हणजेच आयफोन, मॅकबुक वगैरे वस्तू घेण्यासाठी किडनी विकण्याचा मूर्खपणा कोणी करणार नाही असेच तुम्हाला वाटत असेल. पण एका भावाने चक्क ॲपल प्रॉडक्ट घेण्यासाठी किडनी विकली होती.

२०११ साली एक चायनीज तरुण वांग शांगकुंग या भावाने ॲपलचा नाद केला. ब्लॅक मार्केटमध्ये किडनी विकली आणि आयफोन घेऊन आला. तात्पुरती हवा तर झाली, मात्र गडी आता खाटेवर आहे. तो डायलिसिसवर आहे, त्याला चालता फिरता देखील येत नाही. २ लाखांना किडनी विकून पूर्ण आयुष्य त्याने खराब करून घेतले. आता पश्चात्ताप करण्याशिवाय त्याच्या हातात दुसरे काहीही उरले नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required