शिवलिंग सापडेल म्हणून त्यानं हायवेवर खोदला चक्क १५ फुट खोल खड्डा

भाऊ आपला देश खरंच देवभोळा आहे, आज असली भारी बातमी आहे की ती वाचून हसावं की रडावं हेच कळत नाही. तर झालं असं, एका माणसाला स्वप्नात दिसलं की एका ठिकाणी खड्डा खोदला तर शिवलिंग सापडेल. पण ह्या स्टोरीत एक प्रॉब्लेम होता ना भाऊ..

तर ही जी जागा आहे जिथं खड्डा खोदायचा होता, तो नॅशनल हायवे होता.  आणि चक्क तिथं खड्डा खोदण्यात आला.

हे सगळं घडलंय हैदराबाद पासून 80 किमीवर तेलंगणा मध्ये. वारंगल ते हैदराबाद यांच्या मधल्या नॅशनल हायवे १६३ वर काल १५ फूट खड्डा  खोदला गेला. तिथून जवळच्याच जनगाव मध्ये राहणारा मनोज गेली तीन वर्षं इथं शिवलिंग सापडणार म्हणून प्रयत्न करत होता आणि त्याचा हा दावा त्यानं बघितलेल्या स्वप्नावरून केला होता.

 असेल बाबा खरं, दृष्टांत ब्रिष्टांत मिळाला असेल त्याला..  पण नाही हो. हा दृष्टांत चुकीचा निघाला, तिथं काही शिवलिंग सापडलं नाहीच. पण एका हायवेवर एक मोठा खड्डा मात्र तयार झाला.  वाहतूक तितका वेळ थांबवली गेली, त्या प्रवाशांना त्रास झाला. आता तो खड्डा बुजवण्यासाठी कंत्राट दिलं जाईल, कंत्राट देणारे-घेणारे थोडं थोडं खातील आणि थोडया दिवसांनी परत तिथला रस्ता खराब होईल. बघा, हे सांगायला कुणाचा दृष्टांत लागत नाही. खरं ना?

 

आता पावसाळा जवळ आलाय भाऊ.. आता आमच्या रस्त्यावर पण म्युन्सीपालटी स्पेशल खड्डे खोदणार.  त्यांना हे खड्डे  तयार करण्यासाठी स्वप्नात काय दिसतं, काय कळत नाही. तुम्हांला काही माहिती आहे का याच्याबद्दल?

सबस्क्राईब करा

* indicates required