हा होता जगातला पहिला स्पॅम मेसेज...

आपल्या मेल बॉक्स मध्ये स्पॅम मेसेजेससाठी वेगळा इनबॉक्स असतो जेणेकरून फेक ईमेल्स, मालवेयर असलेल्या मेल्स एका जागी जमा होतील आणि त्यांना लगेच डिलीटही करता येईल. ईमेल्स शिवाय फोनवर आणि एस.एम.एस. द्वारेही स्पॅम मेसेज पाठवले जातात. आज आपण त्या स्पॅम मेसेज बद्दल बोलणार आहोत जो जगातला पहिला स्पॅम मेसेज ठरला होता.

मे १८६४ चा तो दिवस

स्रोत

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ईमेल, फोन, एसएमएस, टेलिफोन चा वापर सुरु होण्याअगोदर पासून स्पॅम हा प्रकार अस्तित्वात आहे. जगातला पहिला स्पॅम मेसेज चक्क टेलिग्रामद्वारे पाठवण्यात आला होता.

मे १८६४ साली ब्रिटन मधल्या काही राजकारण्यांना एक टेलिग्राम आला. त्यांनी टेलिग्राम पाहिला. ते एक पाकीट होतं आणि त्याच्या आत एक चिठ्ठी होती. राजकारणी असल्याकारणाने त्यांना साहजिकच वाटलं की चिट्ठीत नक्कीच महत्वाचा मजकूर असणार. पण राव, त्याजागी चक्क एक जाहिरात निघाली. ही जाहिरात होती “Messrs Gabriel” नामक एका दाताच्या दवाखान्याची आणि मेसेज मध्ये लिहिलं होतं, “दवाखाना ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहील”

स्रोत

हा असा टेलिग्राम बघून तर कोणालाही राग येईल ब्वा. तसा तो या राजकारणी मंडळींनाही आला. त्यांनी तत्काळ यावर तक्रार करत म्हटलं, ‘माझा आणि Messrs Gabriel चा काहीही संबंध नसताना तुम्ही कोणत्या हक्काने मला हा टेलिग्राम पाठवत आहात ?’ काहींनी तर याबद्दल टाईम्स वृत्तपत्रात तक्रार देखील छापली. हा सगळा प्रकार त्या एका स्पॅमने घडला राव.

पुढच्या काळात जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतसे नवीन फंडे आजमावून लोकांपर्यंत स्पॅम पोहोचवले जाऊ लागले आणि त्याला आळा घालण्यासाठी नवी प्रणाली तयार करण्यात आली.

सबस्क्राईब करा

* indicates required