लोकसंख्येपेक्षा जास्त गाड्यांची संख्या असणारे शहर...हे फक्त एकाच ठिकाणी होऊ शकते !!

या वर्षी आपली आयपीएलमध्ये टीम नाही. उगाच मुंबईकरांची फालतू कौतुकं आपल्याला ऐकून घ्यावी लागणार. पण या मुंबईकरांना जळवायला आपल्याला आता एक भारी मुद्दा मिळाला आहे. भाऊ, आपलं पुणं परत एकदा भारी ठरलं आहे !!

तर झालं असं की, आपल्या पुण्यात आता वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त झालीय. भारतात हा बहुमान मिळवणारं पुणे हे एकमेव शहर आहे. पुण्याची अंदाजे लोकसंख्या ३५लाख आहे. तर महा बारा नंबर प्लेट असणाऱ्या, म्हणजेच पुणे आरटीओखाली रजिस्टर झालेल्या गाड्यांची संख्या ३६ लाख २० हजाराच्या घरात आहे.  ही माहिती आपल्या आरटीओ साहेबांनीच दिलीय.  

स्रोत

भाऊ, आम्ही तुम्हाला सांगायची गरजच नाही. यात सगळ्यात जास्त वाटा आपल्या बाईक आणि स्कुटर्सचा आहे. पुण्यात तब्बल २७ लाख दुचाकी आणि ६.४५ लाख चारचाकी गाडया आहेत. रोजच्यारोज होणाऱ्या नव्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनमुळे पुणे आरटीओचं वार्षिक उत्पन्न चक्क १००० कोटींच्या पार गेलं आहे. 

मग काय म्हणणं आहे तुमचं? हा आकडा ५० लाखांवर पोहचवायचं टार्गेट कधी पूर्ण करणार आपण ???  तुम्ही यावर विचार करा, तोवर आम्ही हिंजवडीचा ब्रिज पार करतो.

सबस्क्राईब करा

* indicates required