computer

व्हिडीओ ऑफ दि डे : वाघिणीचा हा दुर्मिळ व्हिडीऑ तुम्ही नक्कीच पाहिला नसेल !!

आई शेवटी आई असते मग ती माणसाची असो वा पशु पक्षांची. आईचं प्रेम जसं मिळतं तसंच तिचा रागही सोसावा लागतो. आज आम्ही जो व्हिडीओ घेऊन आलो आहोत त्यात वाघीण आपल्या मुलांना ओरडत आहे. याचं कारण समजल्यावर तुम्हालाही वाटेल की आई शेवटी सगळीकडे सारखीच असते.

तर, हा व्हिडीओ वनाधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाघीण आपल्या मुलांना स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी दूर लोटत आहे. तिची दोन्ही मुलं आईला सोडून जायला तयार नाहीत म्हणून तिला त्यांना रागावून दूर पाठवावं लागत आहे.

वाघांमध्ये नर १८ वर्षांचा झाला की त्याला स्वतःचं क्षेत्र तयार करावं लागतं. या क्षेत्रात फक्त त्यांचीच सत्ता असते. यात संघर्षही होतात. बरेचदा नर १८ वर्षांचे होऊनही आपल्या आईसोबतच राहतात. हा काळ दोन ते अडीच वर्षे असू शकतो. पण शेवटी त्यांना आई पासून लांब जाऊन स्वतःच्या दमावर जगावच लागतं.

या व्हिडीओमधला हा क्षण अत्यंत दुर्मिळ असा आहे. हा क्षण फारच कमीवेळा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुसंता नंदा यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो १७,००० पेक्षा जास्तवेळ बघितला गेला. लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एक ट्विटर युझरने सुसंता नंदा यांना विचारलं की समजा 'दोन्ही नर काही वर्षांनी आईला भेटले तर ते एकमेकांना ओळखतील का?' या प्रश्नाचं उत्तर देताना नंदा म्हणले की 'ते एकमेकांना ओळखतात आणि एकत्र राहतातही.'

तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ? कामेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required